Joe Root become the seventh highest run scorer in Test cricket : वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जो रूटने मोठा पराक्रम केला. त्याने शनिवारी एजबॅस्टन स्टेडियमवर वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडला. कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रूट सातव्या स्थानावर पोहोचला आहे. वृत्त लिहिपर्यंत त्याच्या खात्यात २६१ कसोटी डावात १२०२७* धावा आहेत. लाराने आपल्या कारकिर्दीत २३२ डावात ११९५३ धावा केल्या. तो आठव्या स्थानावर घसरला आहे. रूटने दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉल (११८६७) याला मागे टाकले होते.

जो रूटने डिसेंबर २०१२ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १४३ कसोटींमध्ये ३२ शतके आणि ६३ अर्धशतके केली आहेत. तिसऱ्या कसोटीत त्याने अर्धशतक झळकावले तो ८७ धावा काढून बाद झाला. गेल्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने २०० कसोटी सामन्यांमध्ये १५९२१ धावा केल्या. सचिनने ५१ शतके आणि ६८ अर्धशतके झळकावली, जी सर्वाधिक आहेत.

Sanju Samson Becomes Co Owner of Football Team Mallapuram FC in Super League Kerala
Sanju Samson: संजू सॅमसन क्रिकेट खेळता खेळता फुटबॉल टीमचा झाला मालक
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Duleep Trophy 2024 Dhruv Jurel equaled MS Dhonis record
Duleep Trophy 2024 : विक्रमांचा ‘ध्रुव’तारा; जुरेलने केली महेंद्रसिंग धोनीच्या २० वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
6 feet 7 inches tall 20 years old Josh Hull
ENG vs SL : शूज साईज १५ असलेल्या वेगवान गोलंदाजाचं इंग्लंडसाठी कसोटी पदार्पण, जाणून घ्या कोण आहे ‘तो’?
Joe Root break Steve Waugh record and now 2nd player who scored most Runs in winning Matches
Joe Root : जो रुटने सहा दिग्गजांना मागे टाकत केला मोठा पराक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसराच खेळाडू
Ayush badoni played biggest innings of t20 history in DPL 2024
DPL 2024 : आयुष बदोनीने खेळली भारतीय T20 इतिहासातील सर्वात मोठी खेळी, मोडला श्रेयस अय्यरचा विक्रम
Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over
DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम
Australia Mitchell Starc Statement on the Border Gavaskar Trophy sport news
अॅशेसइतकेच महत्त्व! बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचे विधान

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे, ज्याने १६८ कसोटीत १३३७८ धावा केल्या आहेत. त्याने ४१ शतके आणि ६२ अर्धशतके केली. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने १६६ सामन्यांमध्ये १३२८९ धावा जोडल्या. त्याने ४५ शतके आणि ५८ अर्धशतके केली. भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड चौथ्या स्थानावर आहे. द्रविडने १६४ कसोटीत १३२८८ धावा केल्या. इंग्लंडचा माजी खेळाडू ॲलिस्टर कुक (१६१ कसोटीत १२,४७२ धावा) पाचव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – Paris Olympics 2024: ऑलिम्पिक नगरीत ३ लाखांहून अधिक कॉन्डोमचं वाटप, काय आहे यामागचं कारण

कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

सचिन तेंडुलकर – १५,९२१ (३२९ डाव)
रिकी पॉन्टिंग- १३,३७८ (२८७ डाव)
जॅक कॅलिस – १३,२८९ (२८० डाव)
राहुल द्रविड – १३,२८८ (२८६ डाव)
ॲलिस्टर कुक – १२,४७२ (२९१ डाव)
कुमार संगकारा – १२,४०० (२३३ डाव)
जो रूट – १२०२७* (२६१ डाव)
ब्रायन लारा- ११९५३ (२३१ डाव)

हेही वाचा – Sanjay Manjrekar : ‘…हा विचार आपण सोडून देण्याची वेळ आलीय’; संजय मांजरेकरांचे टीम इंडियाच्या कोचबद्दल मोठे वक्तव्य

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या कसोटीबद्दल बोलायचे तर, क्रेग ब्रॅथवेट ब्रिगेडने पहिल्या डावात २८२ धावा केल्या. यजमान इंग्लंडची पहिल्या डावात सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर बेन डकेटला केवळ तीन धावा करता आल्या. जॅक क्रॉलीने १८ आणि ऑली पोपने १० धावा केल्या. मार्क वुडचे खाते उघडले नाही. हॅरी ब्रूक (२) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. १२व्या षटकापर्यंत ५४ धावा जोडल्यानंतर इंग्लंडने पाच विकेट गमावल्या.