Rohit Sharma Forgot Winning Trophy Funny video viral in IND vs ENG : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १४२ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असा विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत ३५६ धावांचा मोठा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३४.२ षटकांत २१४ धावांवर गारद झाला. या सामन्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट, रोहित आणि राहुल ट्रॉफी विसरले का?

व्हायरल व्हिडीओमध्ये, भारताचे तीन स्टार खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल ट्रॉफी मागे विसरुन पुढे जाताना दिसत आहेत. यानंतर, विराट कोहली काहीतरी म्हणतो. त्यानंतर मग केएल राहुलला आठवते आणि तो मागे वळतो. त्याच वेळी, रोहित शर्मा देखील सोबत जातो आणि नंतर ट्रॉफी उचलतो. दुसरीकडे, विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य होते. या क्षणाचा व्हिडिओ शेअर करून चाहते टीम इंडियाची खिल्ली उडवत आहेत.

सलामीवीर शुबमन गिलने १०२ चेंडूत ११२ धावांची शानदार खेळी केली. श्रेयस अय्यर (७८) आणि विराट कोहली (५२) यांनीही अर्धशतके झळकावली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. फिल साल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ६.२ षटकांत ६० धावांची भागीदारी केली. सामन्याच्या सातव्या षटकात डकेटला (३४) बाद करून अर्शदीप सिंगने ही भागीदारी मोडली. त्याने नवव्या षटकात साल्टला (२३) बाद केले. यानंतर, इंग्लंडच्या विकेट नियमित अंतराने पडत राहिल्या आणि संपूर्ण संघ ३४.२ षटकांत २१४ धावांवर बाद झाला.

इंग्लंडकडून टॉम बँटनने ३८, जो रूटने २४ आणि हॅरी ब्रुकने १९ धावा केल्या. खालच्या फळीत, गस अ‍ॅटकिन्सनने १९ चेंडूत ३८ धावांची जलद खेळी केली. तथापि, यापैकी कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. भारताच्या सर्व सहा गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. अर्शदीप, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी एक विकेट्स घेतली.

या विजयासह, भारत १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पूर्ण आत्मविश्वासाने प्रवेश करेल. त्याआधी, गिलचे शानदार शतक आणि विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांमुळे भारताने ५० षटकांत ३५६ धावांचा मोठी धावसंख्या उभारली, जी या मैदानावरील त्यांची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरला. गिलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma forgot winning trophy funny video viral withvirat kohli and kl rahul after ind vs eng 3rd odi vbm