Sachin Tendulkar Shares Mother Photo: आज जगभरात मातृदिन साजरा केला जात आहे. आईला समर्पित हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यानिमित्त सोशल मीडियावर सर्वजण शुभेच्छा देत आहेत. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकरने आपल्या आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मदर्स डेच्या निमित्त महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याची आई रजनी तेंडुलकरसोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सचिन आपल्या पत्नीला प्रत्येक परिस्थितीत साथ देत असला, तरी त्याचे आईवर विशेष प्रेम आहे. तो त्याच्या आईला भेटत राहतो आणि तिच्यासोबत घालवलेल्या खास क्षणांचे फोटोही शेअर करत असतो.

सचिनने आईचा आशीर्वाद घेतला –

प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे महत्त्व खूप जास्त असते, ती आईच असते जी आपल्याला जन्म देते, आपली काळजी घेते आणि आपल्याला एक चांगला आणि यशस्वी व्यक्ती बनण्यास मदत करते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात त्याच्या आईलाही खूप महत्त्व आहे. अशा परिस्थितीत मातृदिनाच्या या खास प्रसंगी त्यांनी आईच्या चरणांना स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतले.

सचिनने त्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला खूप पसंती केले जात आहे. सचिनने कॅप्शनही खूप छान दिले आहे. त्यांनी लिहिले, “एआयच्या युगात, जे कधीही बदलू शकत नाही ते म्हणजे “एआय” (आई) आहे!” त्याचे हे वाक्य दर्शवते की, तो त्याच्या आईवर किती प्रेम करतो. त्याचबरोबर आजच्या जगातील कोणतीही तंत्रज्ञान आईची जागा घेऊ शकत नाही.

हेही वाचा – SRH vs LSG: उमरान मलिकला संघातून वगळल्याने संतापला इरफान पठाण; म्हणाला, “सनरायझर्स हैदराबाद व्यवस्थापनाने त्याला…”

आईच्या संघर्षामुळे सचिन महान क्रिकेटर बनला –

सचिनला एक महान क्रिकेटर बनवण्यात त्याच्या आईचा महत्त्वाचा वाटा होता. सचिन तेंडुलकरची आई रजनी तेंडुलकर विमा क्षेत्रात काम करत होत्या. तरीही, सचिन जेव्हा क्रिकेट सामने खेळायचा, तेव्हा त्या नेहमी त्याला साथ देत असे. स्वत:चे कार्यालय सांभाळण्यापासून ते घर सांभाळण्यापर्यंत त्यांनी एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणून सचिनसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar says on mothers day in the age of ai the one that is irreplaceable will always be aai vbm