Criticism of Sunrisers Hyderabad management: आयपीएल २०२३ मधील ५८ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स शनिवारी खेळला गेला. या सामन्यात लखनऊने हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. दरम्यान या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये उमरान मलिकचा समावेश नव्हता. त्यामुळे भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने नाराजी व्यक्त केली. त्याने सनरायझर्स हैदराबाद व्यवस्थापनावर आरोपही केला आहे.

उमरान मलिकला लखनऊविरुद्धच्या सामन्यात संधी न दिल्याने इरफान पठाण नाराज झाला आहे. त्यामुळे उमरान मलिकबाबत त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सनरायझर्स हैदराबाद व्यवस्थापनाने उमरान मलिकला व्यवस्थित हाताळले नाही आणि त्याला बाहेर बसवले, असे ट्विट करत म्हणाला आहे.

Action against Samson for slow over rate
IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण?
Sunil Gavaskar's reaction to Surya
MI vs RR : मुंबईला पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर ‘या’ गेम चेंजरची भासत आहे उणीव, माजी दिग्गज सुनील गावसकरांचे वक्तव्य
RR vs DC will be played in the ninth match of IPL 2024
IPL 2024 : आज ऋषभ पंतच्या दिल्लीसमोर संजू सॅमसनच्या राजस्थानचे आव्हान; जयपूरमध्ये कोण मारणार बाजी?
Hardik Pandya Reacts To Defeat
IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

आयपीएल २०२३ चा हंगाम उमरान मलिकसाठी चांगला राहिलेला नाही. त्या यंदाच्या हंगामात सात सामने खेळताना १०.३५ च्या इकॉनॉमीने पाच विकेट घेतल्या आहेत. त्याच्या गोलंदाजीच्या वेगातही घसरण दिसून आली आहे. कदाचित या कारणामुळेच त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले असावे.

हेही वाचा – IPL 2023 : ‘… म्हणून मोहम्मद सिराज फलंदाजांना स्लेजिंग करतो’; स्वत:च्या यशाचे गुपित सांगताना केला खुलासा

उमरान मलिकसाठी इरफान पठाणने केले ट्विट –

सनरायझर्स हैदराबाद संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून उमरान मलिकला वगळल्याने इरफान पठाणने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये इरफान पठाणने लिहले, “लीगमधील सर्वात वेगवान गोलंदाज बाहेर बसला आहे. उमरान मलिकला त्याच्या संघाच्या व्यवस्थापकांनी व्यवस्थित हाताळलले नाही.”

उमरान मलिकने आपल्या वेगाच्या जोरावर गेल्या आयपीएल हंगामात खूप यश मिळवले होते आणि तो एक लोकप्रिय गोलंदाजही बनला होता. याच कारणामुळे त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले. मात्र, ती गती त्याला सातत्याने राखता आली नाही आणि हा मोसम त्याच्यासाठी फारसा चांगला राहिला नाही. त्यामुळेच ज्या सामन्यांमध्ये तो खेळला जात होता, त्यामध्ये तो कमी गोलंदाजी करत होता आणि आता त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले आहे. सनरायझर्सकडे डेल स्टेनसारखा प्रशिक्षक आहे, पण तरीही उमरानच्या गोलंदाजीत सुधारणा झालेली नाही.