Salman Butt comments on Team India’s performance : यंदा भारतीय संघाला आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. त्यासाठी भारतीय संघाने तयारी सुरु केले आहे. म्हणून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना दिली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला चांगली कामगिरी करता आली नाही, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्ट यांनी व्यक्त केले. बट म्हणाला की, भारताकडे एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडू आहेत पण तरीही त्यांना विराट, रोहितसारख्या अनुभवी खेळाडूंची गरज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान बटचे रोहित आणि विराटबाबत मोठं वक्तव्य –

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सलमान बट म्हणाला, “विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह सारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघ योग्य संयोजन शोधू शकत नाही. त्यांच्याशिवाय संघ कमकुवत दिसतो. आम्ही तीन किंवा चार संघ बनवू शकतो असे म्हणणे योग्य आहे, कारण सध्या खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. मात्र, संघात अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे भारताची कामगिरी घसरली आहे. लोक काय म्हणतात याने काही फरक पडत नाही, परंतु त्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुभवाने मोठा फरक पडतो.”

उल्लेखनीय म्हणजे, जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २-१ ने वनडे मालिका जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याने भारताच्या बेंच स्ट्रेंथबद्दल मोठं विधान केले होते. तो म्हणाला होता की, त्यांच्याकडे सध्या पुरेसे दर्जेदार खेळाडू आहेत. त्यामुळे मेन इन ब्लू आणखी दोन संघ निवडू शकतात आणि जगातील कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात.

हेही वाचा – Rohit Sharma: तिलक वर्माला विश्वचषकाच्या संघात मिळणार संधी? आता रोहित शर्माने सांगितली मोठी गोष्ट

मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती दिली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याच्या संघाला ६ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. पाहुण्यांनी निर्णायक सामन्यात २०० धावांनी विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली.

हेही वाचा – Rohit Sharma : विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारताच रोहित शर्मा संतापला; म्हणाला, “तुम्ही जडेजाबद्दल…”

१२ ऑगस्टला भारत आणि वेस्ट इंडिज चौथ्या टी-20 सामन्यात आमनेसामने येणार –

टी-२० मालिकेत, वेस्ट इंडिजने भारतविरुद्ध पहिले दोन सामने सलग जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होता. त्यानंतर टीम इंडियाने गयाना येथे ७ गडी राखून आरामात विजय मिळवून मालिकेतील पहिला विजय नोंदवला. आता फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर १२ ऑगस्ट रोजी चौथ्या टी-२० सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman butt statement team india is weak in the absence of players like virat rohit and jasprit vbm