Sourav Ganguly Statement on Hardik Pandya: टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. आधी न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा २०९ धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियावर बरीच टीका होत आहे. आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टी-२० मध्ये टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला खास आवाहन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौरव गांगुलीने हार्दिक पांड्याला आवाहन केले –

इंडिया टुडेशी बोलताना, दादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीने हार्दिक पांड्याला आवाहन केले आणि सांगितले की “मला हार्दिकला कसोटीत खेळताना पाहायचे आहे, विशेषत: अशा विकेटवर, तो एक महान क्रिकेटर आहे. मला आशा आहे की हार्दिक माझे ऐकत असेल.”

नवीन कलागुणांना संधी द्यायला हवी –

टीम इंडियाचा माजी कर्णधार पुढे म्हणाला की, “भारतात प्रतिभांचा खजिना आहे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही शानदार खेळाडू आहेत आणि जेव्हा तुम्ही त्यांना संधी द्याल तेव्हाच तुम्हाला हे कळेल. जैस्वाल असो की पाटीदार, बंगालचा अभिमन्यू ईश्वरन देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा करत आहेत.”

हेही वाचा – MLC 2023: मुबंई इंडियन्सने किरॉन पोलार्डच्या खांद्यावर सोपवली नवी जबाबदारी, एमआय न्यूयॉर्कसाठी ‘ही’ भूमिका निभावणारा

मला कठोर परिश्रम करावी लागेल –

हार्दिक पांड्याने नुकतेच कसोटी फॉर्मेटमध्ये खेळण्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “जर मला कसोटी क्रिकेट खेळायचे असेल, तर मी कठोर परिश्रम घेईन आणि नंतर पुनरागमन करेन.” हार्दिक पुढे म्हणाला होता की, “मला वाटत नाही की मी अजून कसोटीत माझे स्थान मिळवले आहे, मला कसोटी खेळायचे असेल तर खूप मेहनत करावी लागेल.”

शेवटची कसोटी २०१८ मध्ये खेळली गेली होती –

हार्दिक पांड्याने गेल्या पाच वर्षांपासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. ऑगस्ट २०१८ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. त्या सामन्यात इंग्लंडने ६० धावांनी विजय मिळवला होता. हार्दिकने टीम इंडियासाठी एकूण ११ कसोटी खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५३२ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly has urged hardik pandya to play test cricket vbm