Sourav Ganguly set to resign, BCCI will get a new president avw 92 | Loksatta

Sourav Ganguly: सौरव गांगुली राजीनामा देण्याच्या तयारीत, बीसीसीआयला मिळणार नवा अध्यक्ष

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष लवकरच राजीनामा देणार असून त्याच्या जागी विश्वचषक विजयी संघातील खेळाडू नवा अध्यक्ष होऊ शकतो.

Sourav Ganguly: सौरव गांगुली राजीनामा देण्याच्या तयारीत, बीसीसीआयला मिळणार नवा अध्यक्ष
संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दिग्गजांच्या दोन महत्त्वाच्या बैठका गुरुवारी दिल्लीत पार पडल्या. यामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी सचिव निरंजन शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सहभागी झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली पुढील निवडणूक लढवणार नाही, मात्र मंडळाचे सचिव जय शहा हे नवीन अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. १९८३ च्या विश्वचषक चॅम्पियन संघातील सदस्यांपैकी एक, रॉजर बिन्नी आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला, जे कर्नाटकचे आहेत, ते अध्यक्ष, सचिव किंवा आयपीएल चेअरमन होऊ शकतात. विद्यमान खजिनदार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण हे त्याच पदासाठी पुन्हा उमेदवारी देऊ शकतात. बीसीसीआयच्या एजीएममध्ये कर्नाटक राज्याकडून सचिव संतोष मेनन सहभागी होत होते. 

हेही वाचा :  Ind vs Pak Women’s T20 Asia Cup: पाकिस्तानने रोखला भारताचा विजयरथ, १३ धावांनी केला पराभव 

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे रोहन जेटली, ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे संजय बेहरा, हरियाणा क्रिकेट असोसिएशनचे अनिरुद्ध चौधरी यांच्या नावांची अन्य पदांसाठी चर्चा होती. सध्याचे सहसचिव जयेश जॉर्ज आणि आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल हेही पुढील निवडणूक लढवणार नाहीत.

रॉजर बिन्नी नवे अध्यक्ष होऊ शकतात

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. यात अविशेक दालमिया यांचेही नाव नाही. ते बीसीसीआयमधील पदाचे दावेदार असल्याचे मानले जात होते. एजीएममध्ये सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल चे प्रतिनिधी बनल्याने, आता हे स्पष्ट झाले आहे की बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा मुलगा बोर्डाच्या पुढील व्यवस्थेचा भाग असणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Ind vs Pak Women’s T20 Asia Cup: पाकिस्तानने रोखला भारताचा विजयरथ, १३ धावांनी केला पराभव

संबंधित बातम्या

IND vs BAN 1st ODI: हवेत सूर मारत लिटन दासने घेतला अफलातून झेल, विराट कोहलीही झाला अवाक्
IND vs PAK: सचिन तेंडुलकरच्या वादग्रस्त रनआऊटबाबत वसीम अक्रमचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘ब्रेकच्या वेळी…’
IND vs BAN 1st ODI: यजमानांच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडियाची सपशेल शरणागती, विजयासाठी केवळ १८७ धावांचे आव्हान
T10 League 2022: आंद्रे रसेलने केला कहर; केवळ ११ चेंडूत कुटल्या ५२ धावा, पाहा व्हिडिओ
Lakshya Sen: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेन विरोधात गुन्हा दाखल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Viral Video: मगर आली आणि चिमुकल्याला घेऊन गेली, हतबल वडिलांनी डोळ्यादेखत पाहिला मुलाचा दुर्दैवी अंत
‘चला कर्नाटक पाहू’ नागपूर विमानस्थळाबाहेरील बॅनर्स शिवसैनिकांनी फाडले; ठाकरे गट आक्रमक
सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दिलजीत दोसांझचं मोठं विधान; म्हणाला “सरकारचा नालायकपणा…”
Video: ‘या’ पक्षाची हिंमत तर बघा, चक्क मधमाश्यांच्या पोळ्यावर केला हल्ला अन् तितक्यात…
अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची निवड; प्रक्रिया न राबविता घोषणा केल्याचा आरोप