आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ चा सर्वात महत्वाचा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. ग्रुप-ए आणि ग्रुप-बीचे सामने १६ ऑक्टोबरपासून सुरु झाले आहेत. तसेत स्पर्धचा महत्वाचा टप्पा म्हणजे सुपर-१२ चे सामने २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तत्पुर्वी भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने या स्पर्धेत कोणता फलंदाज सर्वाधिक धावा करेल? याबाबत एक भविष्यवाणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबर आझमला फलंदाजी करताना पाहणे खूप छान वाटते – वीरेंद्र सेहवाग

क्रिकबझच्या एका शोमध्ये सेहवागला विचारण्यात आले की, सर्वाधिक धावा कोण करेल? तेव्हा तो म्हणाला, ‘पाकिस्तानचा बाबर आझम. तो शानदार फलंदाजी करत आहे. विराट कोहलीची फलंदाजी जशी शांतता देते. तसेच बाबर आझमला फलंदाजी करताना पाहणे खूप छान वाटते आणि आनंद मिळतो.

रिझवान सध्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर एकचा फलंदाज –

टीम इंडियाचे सूर्यकुमार यादव, विराट कोहली २०२२ च्या टी२० विश्वचषकापूर्वी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानसह कर्णधार बाबर आझम देखील मजबूत फॉर्ममध्ये आहेत. रिझवान सध्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर एकचा फलंदाज आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : भारत-पाक सामन्यापूर्वी पाकिस्तानला बसला मोठा झटका, नेटसेशनमध्ये ‘या’ फलंदाजाला झाली दुखापत, पाहा व्हिडिओ

टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक धावा –

टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. तसेच विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गट २ मध्ये आहेत. दोन्ही संघ एकमेकांविरुद्धच्या सामन्याने टी२० विश्वचषकातील प्रवासाला सुरुवात करतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 virender sehwag predicts babar azam to finish as leading run scorer vbm