Team India meets Brian Lara: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २० जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने मालिकेची शानदार सुरुवात केली आणि पहिला सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही टीम इंडियाचा इरादा २-० ने मालिका जिंकण्याचा असेल. या सामन्यापूर्वी त्रिनिदादच्या मैदानावर ब्रायन लारा आणि टीम इंडियाच्या खेळाडूंची खास भेट पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, त्रिनिदादच्या मैदानावर वेस्ट इंडिज संघाच्या सराव सत्रादरम्यान दिग्गज ब्रायन लारा उपस्थित होता, त्याचवेळी भारतीय संघ स्टेडियममधून बाहेर पडत होता. विराट कोहली जेव्हा लाराला भेटला, तेव्हा तो फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसला. यानंतर लाराने कोहलीशी हस्तांदोलन केले आणि मिठीही मारली.

त्यानंतर कोहलीशिवाय ब्रायन लाराने कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या इतर खेळाडूंचीही भेट घेतली. त्याच वेळी, तो निश्चितपणे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी काही काळ संवाद साधताना दिसला.

त्रिनिदाद कसोटीत विराट कोहली विशेष दर्जा प्राप्त करेल –

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी त्रिनिदाद कसोटी सामना त्याच्या करिअरसाठी खूप खास असणार आहे. कोहली या सामन्यात खेळेल तेव्हा तो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५०० वा सामना खेळेल. यासह हा विशेष टप्पा गाठणारा तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीनंतरचा चौथा भारतीय खेळाडू ठरणार आहे. कोहलीने आतापर्यंत ११० कसोटी, २७४ एकदिवसीय आणि ११५ टी-२० सामने खेळले आहेत.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, श्रीकर भारत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार

हेही वाचा – ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाचा दबदबा कायम, रोहित शर्माही टॉप १० मध्ये दाखल

वेस्ट इंडिजचा संघ: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उप-कर्णधार), अलिक अथानेज, टॅगिनेरयन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, केमार रोच, केविन सिंक्लेअर, जोमेल वॉरिकन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india and brian lara met before india vs west indies 2nd test match vbm