T20 World Cup Shoaib Akhtar Slams Team India: टी २० विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड दक्षिण आफ्रिकेसमोरील पराभवाने खंडित झाली आहे. भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय हा केवळ आमविश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाचा होता. पण पाकिस्तानसाठी भारताचा विजय हा टी २० विश्वचषकातील अस्तित्वाचा प्रश्न होता. ३० ऑक्टोबरला पर्थ येथे झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात भारताचा ५ विकेट्सने पराभव झाला. सामन्यानंतर टीम इंडिया मुद्दाम वाईट खेळ दाखवला अशाही टीका पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या चाहत्यांकडून करण्यात आल्या होत्या. या सगळ्यात पाकिस्तानचे माजी गोलंदाज शोएब अख्तर यांनी रोहित शर्माच्या टीम इंडियावर कडवी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामना जिंकल्यावर भारतासाठी टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे दार उघडणार होते. मात्र या सामन्यात भारताचा खेळ पाहून निराशाजनक होता असे रावळपिंडी एक्सप्रेस म्हणजेच शोएब अख्तर यांनी म्हंटले आहे. याच दिवशी पाकिस्तानने नेदरलँडला हरवून आपल्या खात्यात २ पॉईंट जमा केले होते, यावेळी भारताच्या विजयाने पाकिस्तानला विश्वचषकात टिकून राहण्याची शक्यता थोडी वाढली असती मात्र भारताने आमची संधी पार मारूनच टाकली असे अख्तर यांनी म्हंटले आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी युट्युब चॅनेलवर भारताच्या फलंदाजीचे विश्लेषण केले. अख्तर म्हणतात की, “दक्षिण आफिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर येताच भारतीय फलंदाज टिकूच शकले नाहीत, चौथ्या षटकापासूनच लुंगी एनगिने चार विकेट घेतल्या, भारताने अवघ्या २६ धावांत चार गडी गमावले. सूर्यकुमार यादवने अर्धशतकासह धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला पण, दक्षिण आफ्रिकेसाठी १३३ धावा करणे कधीही अशक्य नव्हतेच.”

“भारत जरी एक सामना हरला असला तरी यापुढचे सर्व सामने भारतासाठी सोपे आहेत, दुसरीकडे पाकिस्तानचे सर्व कठीण सामने आता सुरु होणार आहेत. पाकिस्तानला अजून दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे. पाकिस्तान आफ्रिकेसमोर जिंकणं कठीणच नव्हे अशक्य वाटत आहे मात्र तरीही मी माझ्या संघाला पाठिंबा देणार आहे.,”असेही अख्तर यांनी म्हंटले आहे.

शोएब अख्तर व्हिडीओ

विराट कोहलीने रूमचा Video Viral करणाऱ्या हॉटेलबाबत घेतला ‘हा’ निर्णय; नेटकरी करू लागले कौतुक

अख्तर म्हणाले की, आमची आशा होती की भारत दक्षिण आफ्रिकेला हरवेल मग पाकिस्तानने जर दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला असता तर आम्हाला संधी मिळाली असती. भारताने आमची खूप निराशा केली. जर भारतीय फलंदाजांनी थोडा संयम राखून खेळ केला असता तर धावसंख्या १५० पर्यंत गेलीच असतीआता दक्षिण आफ्रिका कोणतीच संधी सोडणार नाही. मला मुळात पाकिस्तानच्या संघाच्या निवडीवर प्रश्न होता. आता सर्वच त्याचा परिणाम बघत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india exposed shoaib akhtar slams rohit sharma virat kohli after ind vs sa t20wc group 2 point score board svs