भारतीय संघ नवीन वर्षात श्रीलंकेविरुद्ध पहिली मालिका खेळणार आहे. दोन्ही संघ मंगळवारपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भिडणार आहेत. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाईल. नवीन वर्षात टीम इंडियाच्या जर्सीत बदल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, दीर्घकाळापासून भारतीय जर्सीला प्रायोजित करणाऱ्या एमपीएलने आपले हात मागे घेतले आहेत. जर्सीवरून एमपीएलचा लोगो काढून टाकण्यात आला आहे. एमपीएलच्या जागी, नवीन किट प्रायोजक ‘किलर’ हा कपड्यांचा ब्रँड आहे.

एमपीएलला डिसेंबर २०२३ पर्यंत किट प्रायोजक होण्याचा अधिकार होता. पण त्यांनी करार पूर्ण केला नाही. काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयच्या टायटल स्पॉन्सरमध्ये बदल करण्यात आला होता. पेटीएमने वेळेपूर्वी करार संपुष्टात आणल्यानंतर मास्टरकार्ड बीसीसीआयचे नवीन शीर्षक प्रायोजक बनले.

लेगस्पिनर युझवेंद्र चहलने श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी, भारतीय संघाची नवीन जर्सी घातलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये चहलशिवाय मुकेश कुमार, ऋतुराज गायकवाड, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह दिसत आहेत. चहलने फोटोसोबत कॅप्शन लिहिले, ‘फँटास्टिक फाइव्ह. टी-२० मालिकेसाठी पूर्णपणे तयार.’

आजपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा अनफिट असल्याने हार्दिककडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवला प्रथमच उपकर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित १० जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करणार आहे.

हेही वाचा – ऋषभ पंतच्या अपघातानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याचं मोठं विधान, म्हणाला, “पंतने क्रिकेट खेळाचं….”

बीसीसीआयने गेल्या काही महिन्यांत अनेक प्रायोजक गमावले –

एमपीएल व्यतिरिक्त, बीसीसीआयने गेल्या ६ महिन्यांत अनेक प्रायोजक गमावले आहेत. बीसीसीआयचे देशांतर्गत अधिकार असलेल्या पेटीएमने मास्टरकार्डला आपले अधिकार दिले होते. याशिवाय, बायजूने बीसीसीआयला कळवले होते की तो करार संपण्यापूर्वी बाहेर जाऊ शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The sponsor of indian cricket teams jersey and other kits is going to be killer vbm