भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाला महिला प्रीमियर लीगच्या लिलावात सर्वाधिक बोली लागली आहे. स्मृती मंधानाला आरसीबी संघाने ३.४० कोटींची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीही आरसीबीकडून खेळतो. पण विराट कोहली आणि स्मृती मंधाना यांच्यात एक खास कनेक्शन आहे. ज्याबद्दल आपण जाणून घेऊया.
विराट कोहली पाठोपाठ आता स्मृती मंधाना आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहेत. दोघांच्या एका खास कनेक्शनची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा सुरू झाली आहे. हे विशेष कनेक्शन म्हणजे १८ क्रमांकाची जर्सी. खरंतर, विराट कोहलीही टीम इंडियाकडून खेळताना १८ क्रमांकाची जर्सी घालतो. तर स्मृती मंधानासुद्धा टीम इंडियाकडून खेळताना १८ नंबरची जर्सी घालते. अशा परिस्थितीत दोघांचे हे खास कनेक्शन चर्चेत आले आहे.
आरसीबीने मंधानाला ३.४० कोटींमध्ये विकत घेतले –
महिला आयपीएलसाठी पहिली बोली स्मृती मंधानाला लागली. जी आजपर्यंतची सर्वात मोठी बोली देखील ठरली. स्मृती मंधानाला आरसीबीने ३.४० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. ती टीम इंडियाची महत्वाची फलंदाज आहे. स्मृती मंधानाची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. पण तिला मूळ किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे मिळाले. आता महिलांच्या आयपीएलमध्येही तिची शानदार प्रदर्शम पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – WPL Auction 2023: विश्वचषक विजेती शफाली वर्मा मालामाल; दिल्लीने लावली करोडोंची बोली
कर्णधार बनवले जाऊ शकते –
विशेष म्हणजे विराट कोहली आरसीबीचा कर्णधारही राहिला आहे. तर स्मृती मंधानाकडेही पहिल्या सत्रात आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. अशा परिस्थितीत स्मृती मंधाना आणि विराट कोहली सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. स्मृती मंधानाने तिच्या टी-२० कारकिर्दीत ११२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तिन् २६५१ धावा केल्या आहेत. यादरम्यान स्मृतीने २० अर्धशतकांच्य खेळी केल्या आहेत