Virat Kohli Avneet Kaur Controversy : विराट कोहली हा देशातील इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा सेलिब्रेटी आहे. प्रियांका चोप्रा आणि श्रद्धा कपूर या सिनेतारकांना देखील कोहलीने मागे टाकले आहेत. प्रचंड फॉलोअर्स असताना देखील कोहली क्वचितच इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतो. पण सध्या विराट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने अभिनेत्री अवनीत कौर हिच्या पोस्टला लाईक केल्याची सध्या तुफान चर्चा होताना दिसत आहे.
ही पोस्ट कोहलीने लाईक केली आणि लगेचच लाईक काढून टाकला. मात्र, चाहत्यांच्या नजरेतून त्याची ही कृती सुटली नाही. कोहलीने सुरुवातीला ‘लाईक’ केल्याचा स्क्रीनशॉट इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला. अवनीत कौरने हिरवा क्रॉप टॉप आणि प्रिंटेड रॅप स्कर्ट घातलेला फोटो पोस्ट केला होत्या ज्याला विराट कोहलीने लाईक केले होते.
चाहत्यांकडून हा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला, याबरोबरच लोक या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये विराट कोहलीला ट्रोल करू लागले. यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याने अखेर विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत या संपूर्ण घटनेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
विराट कोहली नेमकं काय म्हणाला?
विराटने पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये त्याने लिहीले की, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझे फीड क्लिअर करताना, असे दिसते की अल्गोरिदमने चुकून इंटरॅक्शन नोंदवले असावे. त्यामागे कोणताही हेतू नव्हता. मी विनंती करतो की कोणतेही अनावश्यक अंदाज बांधू नका. तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.” दरम्यान अवनीत कौरने मात्र या सर्व प्रकाराबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इंस्टाग्रामवर विराट कोहली फक्त २७५ लोकांना फॉलो करतो. या मोजक्या लोकांमध्ये त्याची पत्नी अनुष्का शर्मा, अभिनता अमिताभ बच्चन, वरूण धवन आणि टॉम हॉलंड यांच्यासह काही क्रिकेटपटू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.