India vs England 3rd Test, Shubman Gill: कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंची कसोटी पाहायला मिळते. फलंदाजांना एक- एक धाव घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तर गोलंदाजांना विकेट्स काढण्यासाठीही प्रचंड संघर्ष करावा लागतो. त्यामुळे धावांची गती ही फार कमी असते. पण, इंग्लंडने कंटाळवाणं वाटणारं कसोटी क्रिकेट रोमांचक बनवण्यासाठी बॅझबॉल सुरू केलं होतं. बॅझबॉलमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पण, तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची धावांची गती पुन्हा एकदा कमी झाली आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार शुबमन गिलची खिल्ली उडवली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गिलने बॅझबॉलची खिल्ली उडवली
न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रेंडन मॅक्यूलम इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक बनल्यापासून इंग्लंडच्या फलंदाजीत खूप मोठा फरक पडल्याचे पाहायला मिळाले आहे. बॅझबॉल म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर हल्लाबोल करायचा आणि वेगाने धावा गोळा करायच्या. इंग्लंडने या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये बॅझबॉल स्टाईल क्रिकेट खेळून धावा गोळा केल्या आहेत. मात्र, तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी संथ गतीने फलंदाजी केली आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांची खिल्ली उडवताना दिसून आले आहेत.
तर झाले असे की, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेट ही जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. ही जोडी आक्रमक सुरूवात करेल असं वाटलं होतं. पण, तसं काहीच झालं नाही. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज सावध होऊन फलंदाजी करताना दिसले. बुमराह आणि सिराज यांनी या जोडीला अडकवून ठेवलं. तर नितीश कुमार रेड्डीने एकाच ओव्हरमध्ये जॅक क्रॉली आणि बेन डकेटला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर जो रूट आणि ओली पोपने मिळून इंग्लंडचा डाव सावरला. दोघांनी पहिल्या डावातील पहिल्या सत्रात ३.३२ च्या सरासरीने धावा केल्या. तर दुसऱ्या डावात ही सरासरी आणखी खालावली. दुसऱ्या डावात या जोडीने २.९२ च्या सरासरीने धावा केल्या.
गिलचा व्हिडीओ व्हायरल
तर झाले असे की, भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज सावध होऊन फलंदाजी करताना दिसले. भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीवर इंग्लंडचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. त्यावेळी गिलने इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतली. जो रूट आणि पोप फलंदाजी करत असताना गिल म्हणाला, ” मित्रांनो, चला पुन्हा सुरू झालं ते बोरिंग टेस्ट क्रिकेट..” गिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.