Harbhajan Singh on Suryakumar Yadav: भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू हरभजन सिंगने २०२३च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवच्या निवडीचे समर्थन केले आहे. सूर्याला जरी वन डेमध्ये टी२० फॉर्म दाखवता आला नसला तरी विश्वचषकासाठी संघात त्याची निवड झाली आहे. त्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपले मत व्यक्त केले आहे. “सॅमसनकडे सूर्यासारखा खेळ नाही आणि विराट कोहली किंवा रोहित शर्मा दोघेही ते करू शकत नाहीत,” असे हरभजनने त्याच्या निवडीचे समर्थन करताना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत हरभजन सिंग म्हणाला की, “संजू सॅमसनकडे सूर्यासारखा आक्रमक खेळ नाही. माझ्या मते सूर्यकुमार यादव हा परिपूर्ण खेळाडू आहे. मला वाटत नाही की निवडकर्ते संजू सॅमसनवर कठोर झाले आहेत. माझ्या मते संजू हा खूप चांगला खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू आहे. पण तुम्ही फक्त १५ खेळाडू निवडू शकता. संजूऐवजी सूर्यकुमारची निवड करणे हा बीसीसीआयचा योग्य निर्णय आहे. कारण मधल्या षटकांमध्ये सूर्यकुमार जी फलंदाजी करू शकतो ती संजूकडे असेल असे मला वाटत नाही.”

हेही वाचा: Sunil Gavaskar: “तुमच्या सल्ल्याची गरज नाही, उगाचच…”, भारताच्या संघ निवडीबाबत परदेशी क्रिकेट एक्स्पर्टवर गावसकर संतापले

भज्जी पुढे म्हणाला की, “अगदी तो पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारतो, पण आक्रमक खेळत असूनही तो तुम्हाला मिडल ऑर्डरमध्ये विश्वासार्हता देतो. सूर्यकुमार मोठी धावसंख्या करू शकतो. संजूच्या बाबतीत मला वाटतं की, तो अशा प्रकारचे क्रिकेट खेळतो जिथे तुम्हाला सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते. मला माहित आहे की, अनेक लोक विचारतात की त्याने एकदिवसीय सामन्यात काय केले, परंतु त्याने टी२० मध्ये जे केले ते संजूने देखील केले नाही. जर त्याने मोठी खेळी खेळली तर मला वाटते की सूर्यकुमारपेक्षा चांगला खेळाडू भारतात दुसरा नाही.”

विराट-रोहितही ते करू शकत नाहीत- हरभजन सिंग

हरभजन सिंग विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल म्हणाला की, “त्या परिस्थितीत सूर्या जे करू शकतो, ते ना विराट कोहली करू शकतो, ना संजू किंवा रोहित शर्मा. कारण, तो जे करतो ते ५-६व्या क्रमांकावर फलंदाजी करणे कठीण काम आहे. एम.एस. धोनी आणि युवराज सिंग यांनी हेच केले आहे.” खरं तर, हरभजनचा असा विश्वास आहे की सूर्यकुमार ज्या प्रकारे मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो, अगदी रोहित, विराट आणि सॅमसन देखील करू शकत नाही.”

हेही वाचा: K. Srikanth: शार्दुल ठाकूरचा विश्वचषक संघात समावेश केल्याने माजी मुख्य निवडकर्ते श्रीकांत भडकले; म्हणाले, “’त्याला संधी देणे मूर्खपणाचे…”

माजी फिरकीपटू पुढे म्हणाला की, “त्या क्रमांकावर तिथे फलंदाजी करणे सर्वात कठीण आहे. ओपनिंगमध्ये, तुम्हाला माहित आहे की कुठे स्कोअर करायचे. तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. पण जेव्हा तुम्ही २०-२५ षटकांनंतर फलंदाजीसाठी बाहेर पडता तेव्हा तुम्हाला धावा कुठे करायच्या हे माहित असणे आवश्यक आहे. चौकार मारण्यात तुम्ही अंतर शोधू शकता आणि मला वाटत नाही की भारतीय संघातील कोणीही सूर्यकुमारपेक्षा हे चांगले करू शकेल. जर त्याला प्लेईंग ११मध्ये घेणे हे माझ्या हातात असते तर मी त्याला संघात ठेवू शकलो असतो. कारण जेव्हा तो संघात असतो तेव्हा त्याचा विरोधी संघावर दबाव वाढतो. जोपर्यंत तो क्रीजवर आहे तोपर्यंत गोलंदाजांवर दडपण असेल. सूर्या कोणत्याही दिवशी मॅच विनिंग इनिंग खेळी खेळू शकतो. तो २० चेंडूत ५०-६० धावा करू शकतो.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What suryakumar can do not even rohit virat can do harbhajan supports suryas selection in the world cup team avw