World Cup Schedule: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक ओव्हल येथे होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दरम्यान जाहीर केले जाईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, बोर्डाने संपूर्ण भारतातील डझनहून अधिक ठिकाणांची यादी तयार केली आहे आणि अंतिम निवड यादी लवकरच ICC कडे शेअर केली जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी आयपीएल फायनलच्या आयोजनासाठी अहमदाबादमध्ये बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीनंतर शाह यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान दहा संघांमध्ये विश्वचषक खेळवला जाणार असून, बीसीसीआयने अद्याप वेळापत्रक निश्चित केलेले नाही

सद्य अपडेटनुसार ४६ दिवसांच्या कालावधीत तीन बाद फेरीसह एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. अहमदाबादशिवाय बीसीसीआयच्या यादीतील शहरांच्या मूळ शॉर्टलिस्टमध्ये बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, इंदौर, राजकोट, मुंबई आणि त्रिवेंद्रम यांचा समावेश आहे. नागपूर आणि पुण्याचाही विचार सुरू असल्याचे समजत आहे. लीग सामने १० शहरांमध्ये आयोजित केले जाण्याची शक्यता आहे, आणखी दोन शहरांमध्ये मुख्य स्पर्धेपूर्वी सराव सामने होणार आहेत.

आशिया चषकाचे भविष्य काय? (Asia Cup Schedule)

आशियाई क्रिकेट परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असलेले शाह म्हणाले की, २०२३ आशिया चषक स्पर्धेसाठी पीसीबीने प्रस्तावित केलेले हायब्रीड मॉडेल व्यवहार्य आहे की नाही हे अंतिम करण्यासाठी एसीसीची तातडीची बैठक घेतली जाईल. रविवारी, शाह आशिया चषकाबद्दल त्यांचे विचार अनौपचारिकपणे चर्चा करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या समकक्षांना भेटणार आहेत.

सप्टेंबरमध्ये होणार्‍या या वर्षीच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तान आहे, परंतु भारताने तेथे जाण्यास नकार दिल्याने ACC पर्याय शोधत आहे. अलीकडेच, पीसीबीने सहा संघांच्या स्पर्धेसाठी एक मॉडेल सुचवले होते, जेथे १३ पैकी चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. यासाठी नेपाळसह भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही गट एकत्र आहेत. दरम्यान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश दुसऱ्या गटात आहेत.

हे ही वाचा<< CSK vs GT वेळी पाऊस आलाच तर ‘या’ दोन पद्धतीने ठरणार विजेता! राखीव दिवसाबद्दल BCCI चा निर्णय काय?

हायब्रीड मॉडेलबद्दलचे सर्वात मोठे आव्हान प्रवासाचे आहे. शाह म्हणाले की “दोन किंवा तीन देशांनी” त्यांचे विचार पाठवले आहेत, ज्यावर येत्या दहा दिवसांत एसीसीच्या बैठकीत औपचारिकपणे चर्चा केली जाईल. शाह म्हणाले, ACC चेअरमन या नात्याने यंदा आशिया चषक स्पर्धा व्हावी अशी त्यांची इच्छा होती. दोन्ही देशांमधील राजकीय मतभेदांमुळे २००८ पासून ही स्पर्धा पाकिस्तान किंवा भारतात आयोजित केली गेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup schedule by icc to be revealed on world test championship asia cup future to be decided in acc meeting after ipl finals svs