WTC 2023 Final India vs Australia: भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवून एक दशक उलटले आहे. टीम इंडियाने अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. तेव्हापासून भारतीय संघ अनेकवेळा आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे पण एकदाही चॅम्पियन बनू शकला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेही मत आहे की, “आयसीसी ट्रॉफी जिंकणे हा लहान मुलांचा खेळ नसून महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हे खूप सोपे वाटते.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामन्यादरम्यान रवी शास्त्री यांनी हे वक्तव्य केले. त्यानंतर रवी शास्त्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी२० वर्ल्ड कप (२००७), वन डे वर्ल्ड कप (२०११) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. याशिवाय धोनीच्या नेतृत्वाखाली संघ कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थानी आहे.

हेही वाचा: ODI WC 2023: वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवशी होणार भारत-पाकिस्तान हायहोल्टेज सामना, जाणून घ्या

धोनीनंतर विराट कोहलीने दीर्घकाळ टीम इंडियाची कमान सांभाळली असली तरी आयसीसी ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला कोणतेही मोठे यश मिळवता आले नाही. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला आयसीसीच्या बाद फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

रवी शास्त्रींना एम.एस. धोनीची आठवण झाली

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामना हरल्यानंतर रवी शास्त्री म्हणाले की, ‘आयसीसी ट्रॉफी जिंकणे इतके सोपे नाही, तो काय लहान मुलांचा खेळ आहे का? माही होता त्यावेळी ट्रॉफी जिंकणे सोपे होते. त्याने ते सहजरीत्या अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारताने फक्त एकदाच अंतिम फेरी गाठली आहे, परंतु प्रत्येक वेळी संघ जिंकण्यात अपयशी ठरला आहे.”

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: “चार दिवस टीम इंडिया लढली पण पाचव्या दिवशी …” भारताच्या पराभवानंतर BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नींचे मोठे विधान

टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा WTC फायनलमध्ये हरली

भारतीय क्रिकेट संघाला सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धही संघाची निराशा झाली होती. दोन्ही फायनलमध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय काही चालला नाही. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडच्या शतकांच्या जोरावर ४६९ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाला केवळ २९६ धावा करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १७३ धावांची आघाडी मिळाली. याशिवाय दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सवर २७० धावा करून डाव घोषित केला, त्यामुळे टीम इंडियाला ४४४ धावांचे लक्ष्य मिळाले पण ते २३४ धावांवरच सर्वबाद झाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final dhoni was there then it was possible now forget icc trophy ravi shastri remembered ms dhoni avw