Yuvraj Singh Abhishek Sharma Viral Video: भारताच्या टी-२० संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा २०२५ मध्ये तुफान फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० मालिकेत त्याने सर्वात कमी चेंडूत एक हजार धावा पूर्ण करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. याचबरोबर त्याने मालिकेत १६३ सर्वाधिक युवराज सिंग व अभिषेकचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
अभिषेक शर्माने भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगकडे क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. युवराजने त्याला ट्रेनिंग देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार केलं आहे. युवराजबरोबर सराव करतानाचे अभिषेकचे काही व्हीडिओही आपण पाहिले आहेत. युवराज सिंग अभिषेकला फार सुरूवातीपासून ओळखतो आणि यासह त्याने अभिषेकचं एक सीक्रेट सांगितलं आहे.
अभिषेक शर्मा युवराज सिंगचा व्हायरल व्हीडिओ पाहिलात का?
युवराजने अभिषेक शर्माबाबत एक मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की अभिषेककडून कोणीही काहीही घेऊ शकतो, पण त्याच्याकडून बॅट मात्र कोणीच घेऊ शकत नाही. युवराज म्हणाला अभिषेक त्याच्या बॅटची खूप काळजी घेतो आणि सतत त्याच्याकडे किती बॅट आहेत हे मोजत असतो.
युवराज आणि अभिषेक यांच्या एकत्र मुलाखतीचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. युवराज या मुलाखतीमध्ये म्हणतोय, “तुम्ही अभिषेक शर्माकडून काहीही घेऊ शकता, पण त्याच्याकडून त्याची बॅट कोणीच घेऊ शकणार नाही. तो एखाद वेळेस लढेल, मार खाईल, रडेल पण आपली बॅट देणार नाही. त्याच्याकडे दहा बॅट असतील तरी तो म्हणेल, माझ्याकडे फक्त दोनच बॅट आहेत, दोन किटबॅगमध्ये असतात; ४ घरी असतात. त्याने माझ्या बऱ्याच बॅट घेऊन गेला, मी कधी नको नाही म्हटलं त्याला पण स्वतःची बॅट तो कधीच देत नाही.”
अभिषेक शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली. २५ वर्षीय अभिषेक शर्मा टी-२० मध्ये सर्वात कमी चेंडूंत जलद एक हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. अभिषेकने ५२८ चेंडूत एक हजार धावा पूर्ण करत विश्वविक्रम आपल्या नावे केला.
अभिषेक शर्मा सध्याटच्या घडीला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला अभिषेक प्रत्येक मालिकेत चांगली कामगिरी करत आपलं स्थान अधिक पक्क करत आहे. अभिषेक शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो.
