हिवाळा ऋतू सुरु होण्यास अवघा महिना बाकी आहे. हिवाळ्यात अनेक समस्या येतात. या समस्यांमध्ये डोकेदुखी खूप सामान्य आहे. डोकेदुखी ही बाब सामान्य असली तरी त्याच्या वेदना मात्र, असहय्य असतात. जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर औषधे आणि काही खाद्यपदार्थांमुळे लक्षणे सुधारू शकतात. वेदना कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय आहेत जे आपण घरी वापरु शकताे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी तिच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेल्या तीन खाद्यपदार्थांबद्दल सांगितले आहे. ज्यामुळे तुमची डोकेदुखी लगेच गायब होईल. चला तर जाणून घेऊया हे तीन सोपे आणि घरगुती असे रामबाण उपाय.

१. भिजवलेले मनुके

डोकेदुखी कमी करण्यासाठी भिजवलेले मनुके तुमच्यासाठी आरोग्यदायी असू शकतात. तुम्ही १०-१५ रात्रभर भिजवलेल्या मनुकांचा सकाळी सेवन करु शकता. हे डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी आश्चर्यकारकपणे कार्य करेल. १२ आठवडे सातत्याने सेवन केल्यावर, ते वाढलेल्या वातसह शरीरातील एकूण अतिरिक्त पित्त कमी करते आणि मायग्रेनशी संबंधित सर्व लक्षणे जसे की अॅसिडिटी, मळमळ, चिडचिड, एकतर्फी डोकेदुखी शांत करते.

आणखी वाचा : घसा खवखवत असेल तर स्वयंपाक घरातील ‘हे’ मसाले करतील घसाच्या त्रासातून मुक्त; त्वरीत करा घरगुती उपाय…

२. जिरे-वेलची चहा

जिरे-वेलची चहा हा डोकेदुखीवर चांगला उपाय आहे. अर्धा ग्लास पाणी घ्या, त्यात एक वेलची सोबत एक टीस्पून जिरे टाका आणि ३ मिनिटे उकळा, नंतर हा चहा गाळून घ्या आणि प्या. मळमळ आणि तणाव दूर करण्यासाठी हे उत्तम काम करते. झोपेच्या वेळी किंवा जेव्हा लक्षणे ठळकपणे दिसतात तेव्हा घेता येते.

३. गायीचे तूप

डोकेदुखी कमी करण्यासाठी गायीचे तूप हे उत्तम उपाय आहे. शरीर आणि मनातील अतिरिक्त पित्त संतुलित करण्यासाठी गाईच्या तुपापेक्षा काहीही चांगले काम करत नाही. तूप वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकते, जेवणात, चपातीवर, भातामध्ये किंवा तुपात भाजताना, झोपताना दुधासोबत तुम्ही तूपाचे सेवन करु शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 effective ayurvedic tips to heal migraine pain pdb
First published on: 26-09-2022 at 15:34 IST