Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र शासनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर महराजांचा जन्म झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. राज्य सरकारकडून १९ फेब्रुवारी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते. महाराष्ट्रातील जनता मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने हा दिवस साजरा करते. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते. करोनामुळे घालून दिलेले नियम पाळत यंदाही मोठ्या उत्सहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात १८७० साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. नंतर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली.

त्याकाळात लोकमान्य टिळक जनतेला सोबत घेऊन ब्रिटिश राजवटीविरुध्द लढा देत होते. याचाच एक भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात सार्वजनिकरित्या साजरी करण्याचे आवाहन जनतेला केले. याद्वारे त्यांनी लोकांना स्वातंत्र्य चळवळीत एकत्र आणण्यामध्ये मोठे योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजचे शौर्य आणि योगदान जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहो, यासाठी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजची जयंती साजरी केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२२

अद्याप करोनाचे संकट पूर्णपणे संपले नसल्याने लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने यावर्षीदेखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यावर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत. ‘शिवज्योती रन’मध्ये फक्त २०० लोक सहभागी होऊ शकतात तर ५०० लोक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. राज्याच्या गृह विभागाने बाइक रॅली, मिरवणूक आणि मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत असा सल्लादेखील नागरिकांना देण्यात आला आहे.

लोकांनी सार्वजनिक आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन करून हा दिवस साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati shivaji maharaj shiv jayanti 2022 date history significance and celebrations ttg