बाहेरील जंक फूडशी संबंधित आपल्या सवयी, चुकीचा आहार आणि आजची जीवनशैली आपल्याला आजारी बनवते. तरुणांना लहान वयातच उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेह यांसारखे आजार होण्याचे हे फार मोठे कारण आहे. आपल्यापैकी बहुतेकजण यामागील कारणाचा विचार करत नाहीत. परंतु आपण काय खात आहोत याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुमच्या आहारात समोसे, बटाटे वडे, पुऱ्या, पापड असे तळलेले पदार्थ जास्त असतील, तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच, जर तुम्ही रस्त्यावरील अन्न खाणे किंवा घराबाहेरील रेस्टॉरंटमध्ये खाणे पसंत करत असाल तर लहान वयात तुम्ही गंभीर आजारांना बळी पडण्याची शक्यता आहे. कारण या सर्व ठिकाणी एकदा वापरलेले तेल वारंवार स्वयंपाकासाठी वापरले जाते. जर तुम्ही बाहेरचे पदार्थ खात असाल तर लक्षात घ्या की बहुतांश ठिकाणी या तळलेल्या गोष्टी जुन्या तेलात बनवल्या जातात.

तुम्हीही ‘या’ पद्धतीने पाणी पिता का? आजच करा सवयीमध्ये बदल; अन्यथा होऊ शकते नुकसान

अनेक संशोधनांनुसार, कढईमध्ये उरलेले तेल पुन्हा वापरल्याने, त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात ज्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स वाढतात. या फ्री रॅडिकल्सच्या वाढीमुळे शरीरात जळजळ होऊन अनेक प्रकारचे आजार होतात. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स आर्ट ऑफ इंडिया (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वापरलेल्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर करणे टाळले पाहिजे.

उच्च तापमानात गरम केलेल्या तेलातून हानिकारक पदार्थ बाहेर पडतात. तेल एकापेक्षा जास्त वेळा गरम केल्यावर चरबीचे रेणू तुटत राहतात आणि त्यातून वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत, अन्न दूषित होऊ लागते ज्यामुळे आरोग्यास हानी पोहोचते. जेव्हा तेल वापरले जाते तेव्हा ते उच्च आचेवर शिजते, अशा परिस्थितीत त्यातील काही फॅट्स, ट्रान्स फॅट्समध्ये बदलतात.

आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तुपाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? केसांसाठी आहे अतिशय उपयुक्त

ट्रान्स फॅट्स हे हानिकारक फॅट्स आहेत जे हृदयविकार वाढवू शकतात. पुन्हा वापरलेल्या तेलात ट्रान्स फॅटचे प्रमाण अधिक असते. वारंवार तेल गरम केल्याने कर्करोगाचे आजार होण्याची शक्यता वाढते. या तेलाच्या सेवनाने कोलन कर्करोग, पित्ताशयाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग आणि इतर प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणून, स्वयंपाकाचे तेल पुन्हा वापरण्यापूर्वी नीट विचार करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips do you also use previously used oil know the side effects pvp