मानवी शरीराचा सुमारे ६० टक्के भाग पाण्याने बनलेला असला, तरी शरीराला हायड्रेट ठेवणे, तसेच, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासोबतच, पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. प्रचंड गरमीमुळे खूप घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. अशात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. दररोज कमीतकमी २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक असते. परंतु पाणी पिण्याचीही योग्य पद्धत आहे. तुम्ही या पद्धती पाळत नसाल तर तुम्हालाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आज आपण जाणून घेऊया की आपण पाणी पिताना कोणकोणत्या चुका करतो.

साधे पाणी प्यावे :

कोणत्याही ऋतूत जास्त थंड किंवा गरम पाणी पिऊ नका, कारण ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते. तथापि, आपण कोमट पाणी पिऊ शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

उभे राहून पाणी पिऊ नये :

उभे राहून कधीही पाणी पिऊ नका, कारण उभे राहून पाणी प्यायल्यास हाडांच्या सांध्यांमध्ये पाणी जमा होण्याची शक्यता असते, त्यामुळे सांधेदुखीचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत उभे राहून पाणी न पिण्याचा प्रयत्न करा.

तुम्हालाही आहे जेवल्यावर लगेचच पाणी प्यायची सवय? जाणून घ्या या सवयीचे गंभीर तोटे

एका श्वासात पाणी पिऊ नये :

बरेच लोक थेट एका श्वासात पाणी पितात, परंतु याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्ही थांबून थांबून पाणी पिऊ शकता. याशिवाय जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण असे केल्याने पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

झोपण्यापूर्वी पाणी प्या :

रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे खूप आवश्यक आहे जेणेकरून आपले अन्न चांगले पचते. यामुळे तुमची पचन क्रिया बरोबर राहते. तसेच, टाकाऊ पदार्थ आणि विषारी पदार्थ शरीरातून बाहेर पडत राहतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)