आजही आपल्या देशातील महिला आरोग्याच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यास आणि वैद्यकीय सल्ला मोकळेपणाने घेण्यास घाबरतात. असे बरेच लोक आहेत की, ज्यांना विशिष्ट समस्यांची जाणीव नसते आणि ते शांतपणे होणारा त्रास सहन करीत राहतात. बदलत्या जीवनशैली आणि कामाचा ताण यामुळे सध्या मानसिक आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. या प्रकारच्या कर्करोगामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने महिलांचा मृत्यू होतो. भारतात दरवर्षी सुमारे १.२५ लाख प्रकरणे आणि सुमारे ७५ हजार मृत्यूची नोंद होते. ही फार धक्कादायक बाब आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गर्भाशयाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. हा कर्करोग ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ (HPV) या इन्फेक्शनमुळे होतो. त्याचे निदान नियमित ‘पॅप स्मिअर’ नामक परीक्षणाद्वारे करता येते. या चाचणीत रुग्णाला पाठीवर झोपवून स्पेक्युलमच्या साह्याने गर्भाशयाची तपासणी केली जाते. हे वेदनादायक नाही आणि फक्त काही मिनिटे लागतात. योनीच्या भिंतींना धरून ठेवण्यासाठी स्पेक्युलम नावाचे साधन घातले जाते आणि काही पेशी हळुवारपणे लाकडी स्पॅटुला वापरून घेतल्या जातात आणि काचेच्या स्लाइडवर लावल्या जातात. या स्लाइडची प्रयोगशाळेत असामान्य पेशींसाठी चाचणी केली जाते.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी महिलांना दरवर्षी पॅप स्मिअर किंवा स्क्रीनिंग करण्याची आवश्यकता आहे का? याच विषयावर गुरुग्राम येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरुणा कालरा यांनी सांगितले असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

(हे ही वाचा : आतड्यांमधील जमलेली घाण झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ७ पदार्थ? बद्धकोष्ठतेचा त्रास पुन्हा होणार नाही!)

डॉक्टर सांगतात, “गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झालेल्या ९५ टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये एचपीव्ही हे कारण आहे. सहसा लैंगिक संभोगाद्वारे हा कर्करोग पसरतो. गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे सर्व्हिक्स किंवा ग्रीवा. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. स्त्रियांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो.”

लैंगिकदृष्ट्या अतिसक्रिय असणाऱ्या स्त्रिया आणि पुरुषांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी या व्हायरसचे संक्रमण होते. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे अनेक स्ट्रेन असतात. त्यातील काही स्ट्रेन घातक आहेत. त्याचा संसर्ग झाल्यास गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते; पण ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा संसर्ग झालेल्या प्रत्येकालाच कर्करोग होत नाही. ज्या महिलांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांनाच हा त्रास होण्याची शक्यता असते.

तज्ज्ञ सांगतात, गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी ‘लस’ उपलब्ध आहे; पण लोकांमध्ये या लसीबाबत जनजागृती नाही. अनेक महिलांना ही लस घेतल्याने गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग टाळता येणे शक्य आहे याची माहितीच नाही. गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला काहीच दिसून येत नाहीत. पण, हळूहळू मासिक पाळीच्या दिवसांत अतिरक्तस्राव होणे, लैंगिक संबंध ठेवल्यानंतर होणारा रक्तस्राव, वारंवार योनीमार्गाचे इन्फेक्शन,अशा समस्या दिसून येतात.

(हे ही वाचा : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ ७ सुपरफूड्सचा आहारात समावेश करा, शरीराला ठेवा तंदुरुस्त!)

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग शोधण्यासाठी सर्वांत मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या चाचण्या आहेत. त्यातील एक पॅप स्मीअर चाचणी. तुम्हाला तुम्हाला दरवर्षी पॅप टेस्टची गरज असते. जर तुमची पॅप टेस्ट आणि एचपीव्ही टेस्ट दोन्ही नॉर्मल असतील, तर दरवर्षी पॅप टेस्ट करण्याची गरज नाही. २१ ते ३० वयोगटातील महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की, त्यांनी दर तीन वर्षांनी पॅप चाचणी करावी. ३० ते ६४ वयोगटातील, दर पाच वर्षांनी पॅप चाचणी आणि एचपीव्ही चाचणी करावी. ६५ आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी, डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असल्यास, दर पाच वर्षांनी चाचणी करा, असे त्या सांगतात.

कोणतीही लक्षणे नसल्यास तपासणी करण्याची आवश्यकता नाही. लक्षणे नसलेल्या महिलांमध्ये गर्भाशय ग्रीवामध्ये पेशींमध्ये काही असामान्य बदल होत आहेत का हे शोधण्यासाठी स्क्रीनिंग चाचणी केली जाते. असामान्य ग्रीवाच्या पेशीमुळे कोणतीही लक्षणे पूर्वी उद्भवत नाहीत परंतु स्क्रीनिंग दरम्यान आढळू शकतात, असेही त्या नमूद करतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cervical cancer do you need to get a pap test or screening done every year read to know more pdb
First published on: 19-01-2024 at 14:58 IST