डायबिटीजच्या रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. डायबिटी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रुग्णांना तृणधान्य, प्रथिने, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाज्या यांचे सेवन करावे, ज्याने आरोग्यास खूप फायदे होतात. डायबिटीसच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी दर तासाने काही ना काही खायला हवे. यात ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा. फळे आणि भाज्या हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात अशा फळे आणि भाज्यांचे सेवन करावे, ज्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
भेंडी ही उन्हाळ्यात मिळणारी अशी एक भाजी आहे, जी खाण्याबाबत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये गोंधळ असतो. काही लोकांना असे वाटते की, भेंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. फॅबलकेअरमधील प्रसूती आणि वैद्यकीय आपत्कालीन तज्ज्ञ डॉ. पाखी शर्मा यांनी सांगितले की, डायबिटीसचे रुग्ण भेंडीचे सेवन करू शकतात. भेंडीचे सेवन डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यास प्रभावी ठरते.
भेंडीच्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, त्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन सी असते, जे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया तज्ज्ञांकडून भेंडीच्या सेवनाने रक्तातील साखर कशी नियंत्रित राहते आणि डायबिटीसच्या रुग्णांनी भेंडीचे सेवन कसे करावे.
डायबिटीसचे रुग्ण भेंडीचे सेवन करू शकतात का?
डायबिटीसचे रुग्ण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी भेंडीचे सेवन करू शकतात. भेंडीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे डे डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. लो ग्लायसेमिक इंडेक्स खाद्यपदार्थ हे कार्बोहायड्रेट-समृद्ध अन्नांच्या रँकिंगमध्ये आहेत. लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने, कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागतो. भेंडी हे अँटी-हायपरग्लायसेमिक भाजी आहे जी रक्तातील साखर नियंत्रित करण्यात प्रभावी ठरते.
पीरियड्समध्ये सॅनिटरी पॅड दिवसातून कितीवेळा बदलायचा? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला
डायबिटीसच्या रुग्णांसाठी भेंडी खाण्याचे फायदे:
डायबिटीसच्या रुग्णांनी भेंडीचे सेवन केल्यास त्यांचे वजन नियंत्रणात राहील. फायबर समृद्ध भेंडीचे सेवन केल्याने भूक नियंत्रित राहते आणि जास्त वेळ भूक लागत नाही. याच्या सेवनाने रक्तातील साखर सहज नियंत्रित करता येते.
डायबिटीसच्या रुग्णांनी भेंडीचे सेवन केल्यास हाडे मजबूत राहतात आणि दृष्टी सुधारते. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी समृद्ध भेंडी दृष्टी वाढवण्यासाठी आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
भेंडीचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. हाय ब्लड प्रेशरच्या तक्रारी बहुधा डायबिटीसच्या रुग्णांमध्ये आढळतात. अशा परिस्थितीत भेंडीचे सेवन डायबिटीस नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
डायबिटीसमध्ये भेंडीचे सेवन आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे?
डायबिटीजमध्ये दिवसातून एक छोटी वाटी भेंडी खाल्ल्यास आरोग्याला फायदा होतो. डायबिटीसचे रुग्ण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात भेंडीचे सेवन करू शकतात.
