चालणे हा उत्तम व्यायाम मानला जातो. चालण्याने शरीराची हालचाल होऊन, वजन नियंत्रित राहण्यासही मदत मिळते. तसेच हा सर्वात सोपा व्यायाम आहे. अनेकांना त्यांच्या शारीरिक स्थितीवरून कठीण व्यायाम टाळण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी नियमितपणे चालण्याचा व्यायाम त्यांच्यासाठी उपयोगी ठरतो. पण सरळ चालण्याबरोबरच उलट चालण्याचेही आरोग्याला अनेक फायदे मिळतात हे तुम्हाला माहित आहे का? उलट चालणे कंबरदुखी, गुडघेदुखीवर सोपा उपाय मानला जातो. यामागचे कारण काय आणि उलट चालणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उलट चालण्याचे फायदे

आणखी वाचा: ‘या’ सवयींमुळे वाढू शकतो मधुमेह होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

  • उलट चालल्याने गुडघेदुखी पासून सुटका मिळण्यास मदत होते. कारण चालताना गुडघ्यांवर तणाव पडतो आणि त्यामुळे गुडघे दुखतात, याउलट चालताना हा तणाव पडत नाही. तसेच उलट चालल्याने गुडघ्यांवरील सुज कमी होण्यास मदत मिळते.
  • उलट चालल्याने पाय अधिक मजबुत होतात, कारण उलट चालताना पायांवर अधिक भार पडतो आणि स्नायूंचा व्यायाम होतो, ते अधिक मजबुत होतात.
  • कंबरदुखीचा त्रास असणाऱ्यांनाही उलट चालणे फायदेशीर ठरू शकते. कारण उलट चालल्यामुळे पाठीची हाडं मजबुत होण्यास मदत मिळते, तसेच स्नायूंचा व्यायाम होतो.
  • सरळ चालत असताना पायांमधील काही स्नायूंचा वापर होत नाही, त्या स्नायूंचा वापर उलट चालताना होतो, त्यामुळे ते अधिक मजबुत होण्यास मदत मिळू शकते. जर पायाला एखाडू दुखापत झाली असेल, ती बरी झाल्यानंतरही पायात वेदना जाणवत असतील. तर अशा वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी उलट चालणे फायदेशीर ठरू शकते.
  • शरीरातील एक्स्ट्रा कॅलरी बर्न करण्यासाठीही उलट चालण्याचा फायदा होऊ शकतो.

आणखी वाचा: नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करतात ‘हे’ पदार्थ; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

अशाप्रकारे उलट चालणे अनेकप्रकारे फायदेशीर ठरते. शारीरिक फायद्यांसह हे मानसिकरित्या ही फायदेशीर ठरते. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते. उलट चालताना मागचे दिसत नसल्यामुळे इतर गोष्टींचा अंदाज घेत चालतो, यामुळे लक्ष केंद्रित करण्यासाठी फायदा होतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the amazing health benefits of reverse walking daily habit of it can help in many ways pns
First published on: 06-12-2022 at 13:11 IST