Chicken During Pregnancy: आई होणे ही एक सुंदर भावना आहे, परंतु या काळात गर्भवती महिलेने योग्य खाण्यापासून तिच्या जीवनशैलीबद्दल अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक गर्भवती महिलेने गरोदरपणात पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. आईचा थोडासा निष्काळजीपणा देखील बाळाला हानी पोहोचवू शकतो, म्हणूनच यावेळी आहारावर नियंत्रण घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला यात महत्वाचा ठरतो. मात्र, या काळात मूड बदलणे, जेवणाची लालसा, चवीतील बदल हे सतत घडत राहतात. एकदा का एखाद्या गोष्टीची चव आवडली की ती पुन्हा पुन्हा खायची इच्छा होते. गरोदर स्त्रीला गरोदरपणात चिकन खाण्याची शिफारस केली जाते. मात्र गर्भवती महिलांसाठी किती फायदेशीर आहे आणि ते खाताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथिने –

चिकन हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी प्रथिने आवश्यक असतात. चिकनमध्ये असलेले प्रथिने बाळाच्या पेशी तयार करण्यास मदत करतात.

लोह –

चिकनमध्ये लोह देखील भरपूर असते, जे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. हिमोग्लोबिन शरीरातील पेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते. लोहाचे सेवन केल्याने अशक्तपणा टाळता येतो, जी गर्भधारणेदरम्यान आढळणारी एक सामान्य आरोग्य समस्या आहे.

जीवनसत्त्वे आणि खनिजे –

चिकन हे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा खजिना आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी , व्हिटॅमिन ए आणि झिंक सारखे पोषक घटक आढळतात, जे बाळाच्या अवयवांच्या आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या विकासासाठी आवश्यक असतात.

कमी फॅट –

चिकनमध्ये फॅटचे प्रमाण कमी असते. यामुळे गरोदर महिलांसाठी हे फायदेशीर मानले जाते. कारण वजन वाढण्याचे टेन्शन नसते.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

चांगले शिजवा –

चिकन खाण्यापूर्वी, ते चांगले शिजले आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. गर्भवती महिलांना कमी शिजवलेले किंवा कच्चे चिकन देऊ नये. कारण ते आई आणि मूल दोघांसाठीही घातक ठरू शकते.

हार्मोन्स –

हल्ली बाजारात येणाऱ्या कोंबड्या या कृत्रिमरित्या वाढवेलल्या असतात. याचा गर्भवती महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

सोडियम सामग्री –

सॉसेज किंवा प्रक्रिया केलेले मांस यासारख्या काही चिकन उत्पादनांमध्ये सोडियम जास्त असू शकते. गर्भवती महिलांना सोडियमचे जास्त सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा – Skin Care Tips: ‘या’ फुलामध्ये लपला आहे सौंदर्याचा खजिना; फुलापासून बनवा घरच्या घरी फेसपॅक

गरोदरपणात आपल्या आहारात कोणत्याही खाद्यपदार्थाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During pregnacy eating chicken know about its health benefits and precautions srk