Heart Attack: हल्ली हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कधी हृदयविकाराचा झटका आल्यावर आल्याचा तुकडा चघळल्याने आराम मिळू शकतो, याबद्दल ऐकले आहे का? आयुर्वेद चिकित्सक मनीष यांच्या मते आल्याचा तुकडा चघळल्याने अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते. हृदयविकाराचा झटका आल्याने काय होते? हृदयविकाराचा झटका ST-सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन (STEMI) म्हणून ओळखला जातो आणि हे तेव्हा होते, जेव्हा मुख्य हृदय धमनी पूर्णपणे अवरोधित होते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन ( NCBI ) नुसार , STEMI हे कोरोनरी धमनी रोगाची सर्वात तीव्र अभिव्यक्ती आहे आणि रोगाशी आणि मृत्यूशी संबंधित आहे. "मायोकार्डियल इस्केमिया आणि इन्फार्क्टचा आकार मर्यादित करण्यासाठी लवकर निदान करणे गरजेचे आहे." आल्याचे फायदे काय? NCBI च्या दुसऱ्या संशोधनानुसार, आले मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे आणि सुप्रसिद्ध मसाल्यांपैकी एक आहे. भारतात अनेक पदार्थांमध्ये आल्याचा सर्वाधिक वापर केला जातो. आल्याचे अनेक औषधी फायदे आहेत. व्हिटॅमिन ए, सी, ई व बी-कॉम्प्लेक्सचा एक उत्तम स्रोत म्हणून आले ओळखले जाते. त्याचबरोबर त्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, आर्यन, झिंक, कॅल्शियम व बीटा कॅरेटीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात. हा दावा खरा आहे का? डॉ. सुधीर कुमार, सल्लागार न्यूरोलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल यांनी सांगितले की, हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. कार्यक्षमतेचा कोणताही संशोधन-आधारित पुरावा नाही. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामध्ये आले चघळण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, कोणतीही वैद्यकीय मदत येण्यापूर्वी ॲस्परिन वापरल्याचा पुरावा आहे. ॲस्परिन लवकर किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी घेतल्यास हृदयविकाराचा झटका आल्यावरही जीव वाचू शकतो. कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुभेंदू मोहंती यांनी दाव्याचे खंडन करत 'द इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितले की, "यात काही तथ्य नाही. हृदयविकाराचा झटका आल्यास जीवन वाचवण्यासाठी तुम्ही रुग्णालयात जाण्यापूर्वी स्पिरिनची ३०० मिलीग्राम टॅब्लेट चघळू शकता. उर्वरित उपचार रुग्णालयामध्येच केले जाऊ शकतात." हेही वाचा: दिवसातून ४-५ लिटर पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होऊ शकते? वाचा तज्ज्ञ काय सांगतात… डॉ. कुमार यांच्या म्हणण्यानुसार, नायट्रोग्लिसरीन हे आणखी एक औषध, जे मदत करू शकते (विशेषतः जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असलेल्या डॉक्टरांनी सल्ला दिला असेल.) "जर हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती श्वास घेत नसेल आणि बेशुद्ध असेल तर CPR (कार्डिओ-पल्मोनरी रिसुसिटेशन) त्वरित सुरू केली पाहिजे. रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला शक्य तितक्या लवकर जवळच्या रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे."