Iron Deficiency: शरीरात हिमोग्लोबिनची निर्मिती व्हावी यासाठी आयर्न अत्यंत गरजेचे असते. जर शरीरात आवश्यक प्रमाणात हिमोग्लोबिन नसेल तर शरीरातील अवयवांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. यासह शरीरात आयर्नची कमतरता निर्माण झाली की काही गंभीर समस्या उद्भवू शकतात कोणत्या आहेत त्या समस्या जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयरनची कमतरता निर्माण झाल्यास उद्भवणाऱ्या समस्या:

नैराश्य (डिप्रेशन)
शरीरात आयर्नची कमतरता निर्माण झाल्यास नैराश्यासारखी गंभीर समस्या उद्भवू शकते. शारीरिक, मानसिक थकवा जाणवणे हे आयर्नच्या कमतरतेचे लक्षण असु शकते. यासह विटामिन १२ च्या कमतरतेमुळेही अशी लक्षणं दिसु शकतात.

अ‍ॅनिमिया
शरीरातील सगळ्या अवयवांना कामं करण्यासाठी प्रत्येक पेशीला पुरवला जाणारा ऑक्सिजन ज्या लाल रक्त पेशींमधून मिळतो त्या लाल रक्त पेशींमधले हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अ‍ॅनिमिया आजार होतो. आयर्नमुळे शरीरात हिमोग्लोबिनची निर्मिती होते. म्हणून आयर्नची कमतरता निर्माण झाल्यास अ‍ॅनिमिया होऊ शकतो.

हाडांशी निगडित आजार
आयर्नची कमतरता निर्माण झाल्यास हाडांशी निगडित आजार होऊ शकतात. यामुळे पाठदुखीसारखा त्रास होऊ शकतो. याशिवाय आणखी काही समस्या उद्भवू शकतात.

ब्रेन फॉग
आयर्नच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे ब्रेन फॉग होण्याची शक्यता वाढते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iron deficiency can cause depression anemia know what other health problems can occur pns