Winter Diet For Pregnant Women: प्रत्येक महिलेसाठी तिचा गर्भधारणेचा काळ खास आणि अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात महिलांना त्यांच्या आणि होणाऱ्या बाळाची काळजी घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यासाठी फिटनेस आणि आहाराची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. कारण गर्भवती महिलांच्या आहाराचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव हा त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. हिवाळ्यात गर्भवती महिलांनी त्याच्या गर्भधारणेच्या काळात कोणत्या पदार्थांचं सेवन करावं किंवा कोणते पदार्थ खायला हवं, याबाबत जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गरोदरपणात महिलांनी कोणता आहार घ्यायला हवा?
गर्भवती महिलांनी शरीराला कॅल्शियम मिळावं म्हणून काजू, भाज्यांचे सूप, ताजी फळं किंवा अंजीरचं सेवन करायला हवं. त्याचबरोबर शरीराला आवश्यक प्रमाणात प्रोटिन्स मिळावेत यासाठी दूध, शेंगदाणे, चीज, काजू, बदाम, डाळी, मांस, मासे, अंडी खाऊ शकता.

‘असा’ असावा पौष्टिक आहार

हिरव्या भाज्या

गरोदरपणात हिरव्या भाज्या खाल्यामुळे फायबर, आर्यन आणि अनेक प्रकारचे विटामिन असतात. पालक, लेटस, कोबी सारख्या भाज्या शरीरासाठी फायदेशीर असतात. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या आरोग्याच्या स्थितीनुसार कच्च्या हिरव्या भाज्या खाणे गरजेचे आहे. या हिरव्या भाज्यांच्या मदतीने तुम्ही अनेक टेस्टी पदार्थ, सलाड बनवू शकता.

दही

गरोदर महिलांना संपूर्ण कॅल्शियमयुक्त आहाराची गरज असते. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते आणि हाडे मजबूत करण्याचा उत्तम उपाय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या डेअरी उत्पादनातील चांगले बॅक्टेरिया पोटाच्या समस्या आणि यीस्ट इन्फेक्शनला प्रतिबंध करतात. मात्र दही डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे आणि संध्याकाळी ५ नंतर शक्यतो दही खाऊ नये.

अंडे

अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमीन आणि मिनरल्स हे सगळे पोषक घटक असतात. म्हणून अंड्याला Complete Food म्हटंले जाते. त्यामुळे एका दिवसात ३ ते ४ अंडी खाल्यास तुम्हाला हे सगळे घटक मिळू शकतात. आपल्या आहारात शक्यतो अंड्याचा समावेश असावा.

(आणखी वाचा : Benefits of eating dates: हिवाळ्यात खजूर खाण्याचे ‘हे’ ५ जबरदस्त फायदे )

​मासे
मासे हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा उत्तम स्रोत आहे. काही डॉक्टरांच्या मते, या आवश्यक चरबीचा प्रजनन क्षमतेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ओमेगा -3 फॅटी ऍसिड समृद्ध आहार ओव्हुलेशन नियंत्रित करण्यास, अंड्याची गुणवत्ता सुधारण्यास आणि अंडाशयांचे वृद्धत्व कमी करण्यास मदत करू शकते.

बेरी

बेरी हे व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्रोत आहे. यामध्ये आवश्यक जीवनसत्व, अँटिऑक्सिडेंट असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात आणि हिवाळ्याच्या सर्दीदरम्यान सामान्य असलेल्या श्वसन संक्रमणांशी लढण्यास मदत करतात. बेरीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आणि विरोधी दाहक आणि अँटीव्हायरल प्रभाव असतो.

ड्रायफ्रुट्स

डॉक्टर नेहमीच आहारात काजू, बदाम, अक्रोड, मनुका खाण्याचा सल्ला देतात. कारण यात ही Fats, Proteins, Vitamins आणि Minerals असतात. आहाराची काळजी घेणे तर महत्त्वाचे आहेच पण व्यायाम देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थीतीत अधिक काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. शक्यतो सटॉल वरील खाणे टाळा. तुम्ही जितकी स्वत:ची काळजी घ्याल आणि जितका आराम कराल तितकंच तुम्हाला त्याचा फायदा होईल.

हेल्दी प्रोटीन

गरोदरपणात प्रथिनांचे सेवन फार महत्वाचे आहे. चिकन व्यतिरिक्त तुम्हाला डाळी, पनीर, चीज, बीन्स आणि अंडी यांपासून प्रोटीन मिळू शकते. याशिवाय इतर अनेक प्रकारचे पोषक घटक जसे की अमिनो अॅसिड, लोह, पोटॅशियम आणि अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट्स या मसूरमध्ये मुबलक प्रमाणात असतात. ही मसूर स्वस्त प्रोटीनसाठी सर्वोत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnant women should consume these foods in winter it will be beneficial for the health of mother and baby pdb