सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला झोपेतून उठल्या उठल्या पाठदुखी होत असेल तर त्याचे कारण जेवल्यानंतर लगेच झोपणे हे असू शकते. “तुम्ही उठता तेव्हा पाठदुखी होण्याचे एक कारण म्हणजे तुम्ही पोट भरून जेवता आणि लगेच झोपता. तुमचे पोट भरलेले असताना तुम्ही जाऊन सरळ झोपता, त्यामुळे मणक्यावर दाब पडतो आणि ते अनेक अवयवांना कार्य करू देत नाही,” असे सद्गुरु यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये सूर्यास्तापूर्वी खाण्याच्या पारंपरिक पद्धतीचे कौतुक करताना सद्गुरु म्हणाले, “पाठदुखीची इतरही कारणे आहेत, पण झोपण्यापूर्वी किमान तीन ते चार तास आधी जेवण करावे, त्यामुळे पाठदुखी होणार नाही.” पाठदुखी टाळण्यासाठी सद्गुरुंनी दिलेल्या या सल्ल्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, याबाबत इंडियन एक्स्प्रेसने जाणून घेतले आहे.

हेही वाचा- पॉप सिंगर झेन मलिक पराठा खाऊ शकतो मग तुम्ही का नाही? पराठा खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…

खरचं पोटभर जेवून लगेच झोपल्यास पाठदुखी होऊ शकते का?

पाठदुखीची विविध कारणे असू शकतात. जसे की, काहीतरी जड उचलणे, पाठीवर पडणे ज्यामुळे दुखापत होते, व्यायामाचा अभाव, चुकीच्या पद्धतीने बसणे आणि वाकणे. “पाठदुखी आणि पोटभर झोपणे यांच्यातील परस्परसंबंध दर्शवण्यासाठी पुरेसे वैज्ञानिक संशोधन किंवा पुरावे नाहीत. जर तुमची पाठदुखी एक किंवा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर सल्लागार तज्ज्ञ अशा परिस्थितीमध्ये मदत करू शकतात. प्रभावी उपचार योजनेसाठी तुमच्या पाठदुखीचे मूळ कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे,” असे दिल्लीच्या अपोलो स्पेक्ट्रामध्ये कार्यरत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रिती जैन यांनी सांगितले.

हेही वाचा – केळी आणि दह्याचे एकत्रित सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

पण, डॉ. जैन पुढे म्हणाल्या की, “रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोप लागणे ही एक अस्वास्थ्यकर सवय असू शकते, ज्याला आपल्या आरोग्यासाठी बदलावी लागेल; या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नये. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, यामुळे पोटातील अन्न अन्ननलिकेमध्ये वरच्या दिशेने जाऊ शकते, ज्यामुळे छातीत जळजळ, अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लेक्स रोग (GERD) सारख्या समस्या उद्भवू शकतात.”

जेवल्यानंतर लगेच झोपल्यास आरोग्यावर काय होतो परिणाम

डॉ. जैन म्हणाल्या की, “एखाद्या व्यक्तीला अचानक वजन वाढण्याचा अनुभवदेखील येऊ शकतो.” या सवयीचे सतत पालन केल्याने तुमच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो. “यामुळे निद्रानाश, पॅरासोम्निया, स्लीप एपनिया आणि स्लीपवॉकिंगसारखे झोपेचे विकार होऊ शकतात,” असे डॉ. जैन यांनी स्पष्ट केले.

पचनास मदत करण्यासाठी झोपेच्या २ ते ३ तास आधी खाण्याचा प्रयत्न करा. “जेवणानंतर लांब फिरायला जाण्यासारख्या आरोग्यदायी सवयींमध्ये गुंतल्याने गतिशीलता सुनिश्चित होऊ शकते आणि पोट फुगणे आणि गॅससारख्या समस्यांची शक्यता कमी होते,” असे डॉ. जैन यांनी सांगितले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadhguru says going to bed with a full stomach may cause backache an expert weighs in snk