Mint Chutney Health Benefits: अनेक भारतीय घरांमध्ये चटणी, लोणची, पापडांशिवाय जेवण अपूर्ण असते. पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे, लोक गोड, आंबट, तिखट आणि मसालेदार अशा असंख्य चवींमध्ये विविध प्रकारच्या चटण्या खातात. पण तुम्हाला माहीत आहे का की नुसते जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा चटणी अत्यंत फायदेशीर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये आहारातील मसाल्यांचे महत्त्व सांगितले आहे. त्या सांगतात की, “मी चटणी- सॉसच्या वापराच्या विरोधात असते कारण बाजारातून खरेदी केलेल्या, पॅकेज केलेल्या वस्तूमध्ये फॅट्स, साखर आणि मीठ असते ज्यामुळे लठ्ठपणा, जळजळ आणि ऍसिडिटी सारखे दुष्परिणाम होऊ शकतात, यापेक्षा आपल्या घरातील पुदिन्याची चटणी चविष्ट व निरोगी पर्याय ठरते.

पुदिन्याच्या चटणीचे फायदे पाहण्याआधी आपण त्याची रेसिपी पाहूया. यासाठी आपल्याला पुदिन्याची ताजी पाने, कोथिंबीर, आले आणि लसूण एवढी मोजकी सामग्री पुरेशी ठरते. हे सर्व पदार्थ एकत्र वाटून त्यात शेवटी लिंबाचा रस पिळावा. उन्हाळ्याच्या दिवसात या चटणीत कैरी सुद्धा घालू शकता.

पुदिन्याच्या चटणीचे फायदे

१) अपचन दूर करण्यास मदत करते: पुदिन्यात फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट्सने असते जे पचनासाठी उपयुक्त ठरतात. अपचनामुळे होणारा वायू कमी करण्यास सुद्धा मदत होते.

२) त्वचेच्या समस्या कमी करते: पुदिन्याच्या पानांमध्ये उच्च पातळीचे सॅलिसिलिक ऍसिड असते, जे मुरुम आणि डागांचे प्रमाण कमी करते.

३) पुदिन्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते, यामुळे विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात पुदिन्याचे दाहक-विरोधी गुणधर्म तुमच्या पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.

४) पुदिन्याचा अर्क xanthine oxidase ला प्रतिबंधित करतो, जे युरिक ऍसिडच्या निर्मिती करणारे एन्झाइम आहे.

५) MY22BMI च्या संस्थापक, आरोग्य प्रशिक्षक, प्रीती त्यागी यांनी शेअर केले की कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने पचनास मदत करण्यासाठी ओळखली जातात.पुदिन्याची पाने मळमळ दूर करण्यास आणि छातीत जळजळ कमी करण्यास मदत करतात.

६) ही पाने आतड्याचे कार्य सुधारण्यास मदत करतात ज्यामुळे शरीराचे एकूण कार्य सुधारते.

७) पुदिन्याची चटणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते

८) श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका करण्यासाठी पुदिना उपयुक्त ठरतो.

हे ही वाचा<<खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढते ‘ही’ चटपटीत चटणी; चला बघूया आहारतज्ज्ञांची सोपी रेसिपी

तुम्ही सुद्धा घरी ही चटणी बनवत असाल तर नियमित आहारात सुद्धा याचा समावेश करायला विसरु नका.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer health news mint chutney benefits throws uric acid out of body makes skin hydrated know from expert svs