scorecardresearch

खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढते ‘ही’ चटपटीत चटणी; चला बघूया आहारतज्ज्ञांची सोपी रेसिपी

Recipes To Remove Bad Cholesterol: हेल्दी राहायचं म्हणजे चटपटीत खाण्याला राम राम करावं लागणार, हो ना? आता उलट आपण एक अशा चटणीची रेसिपी पाहणार आहोत जी तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.

Bad Cholesterol Kicked Out Of Blood And Kidney With these Easy Chutney Recipe Shared By Nutritionist
खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढते 'ही' चटपटीत चटणी (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Recipes To Remove Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी आवश्यक घटक आहे. अभ्यासकांच्या माहितीनुसार शरीरात टेस्टोस्टेरोन, एस्ट्रोजेन सह २० हुन अधिक आवश्यक हार्मोन्सची निर्मिती ही कोलेस्ट्रॉलमुळे शक्य होते. कोलेस्ट्रॉल शरीराच्या मेटाबॉलिज्मचा वेग वाढवतो. पण हाच मेणासारखा कोलेस्ट्रॉल शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जमून राहिल्यास रक्त प्रवाहात अडथळा येऊन अवयवांना धोका पोहोचू शकतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम आहार घेणे आवश्यक असते. साधी नियमावली पाहायची तर अतिरिक्त मीठ व साखर असणारे पदार्थ व फळं/भाज्या टाळायला हवे.

आता तुम्हाला वाटलं असेल की हेल्दी राहायचं म्हणजे चटपटीत खाण्याला राम राम करावं लागणार, हो ना? आता उलट आपण एक अशा चटणीची रेसिपी पाहणार आहोत जी तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी कोलेस्ट्रॉल नियंत्रण करणाऱ्या चटणीची रेसिपी शेअर केली आहे.

कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या चटणीची रेसिपी

  • कोथिंबीर – 50 ग्रॅम
  • पुदिना – 20 ग्रॅम
  • हिरवी मिरची (आवश्यकतेनुसार)
  • लसूण – 20 ग्रॅम
  • आळशीच्या बियांचे तेल – 15 ग्रॅम
  • इसबगोल – 15 ग्रॅम
  • मीठ (चवीनुसार)
  • लिंबाचा रस – 10 मिली
  • गरजेनुसार पाणी

कृती:

वरील सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये टाका आणि मिक्स करून बारीक पेस्ट बनवा.

हे ही वाचा<< रसगुल्ला बनवून Valentine महिना करा गोड; अवघ्या ५ वस्तूंमध्ये ट्राय करा ही रेसिपी

कोथिंबीर आणि पुदिन्याचे फायदे

कोथिंबीर व पुदिन्यात असणारे क्लोरोफिल तसेच मुबलक फायबर पचनप्रक्रियेला वेग देण्याचे काम करते. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर पडण्यास मदत होते.

लसणाचे फायदे

लसणातील सेलेनियम व अँटी ऑक्सिडंट्समुळे लिव्हरमधील टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलचा अडथळा दूर करून रक्तप्रवाह सुरळीत करण्याचे काम सुद्धा लसूण करते.

इसबगोलचे फायदे

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी व पचनास वेग देण्यासाठी इसबगोल उपयुक्त ठरते. क्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासही याची मदत होते.

हे ही वाचा<< शौचावाटे लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ ५ पदार्थ? तज्ज्ञांनी सांगितली डिटॉक्सची पद्धत

आळशीच्या बियांचे फायदे

आळशीच्या बिया या ओमेगा-३ फॅट्सने समृद्ध असा स्रोत आहे जो कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करतो आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासही मदत करतो.

मराठीतील सर्व रेसिपी ( Recipes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 19:44 IST
ताज्या बातम्या