भारतीय लोक रोजच्या आहारात भरभरून तूप खातात. पोषणाने समृद्ध असलेलं हे सुपरफूड मानलं जातं. मात्र यात भरपूर फॅट्स असल्याने ते खावे की नाही याबाबत अनेक लोक साशंक असतात. फिटनेसप्रेमी तूप आहारात समाविष्ट करण्यापूर्वी दोनदा विचार करतात.
डॉक्टरांच्या मते, दररोजच्या जेवणात तूप घेणं फायदेशीर आहे. पण, जर तुम्ही तूप पूर्णपणे बंद केलं तर शरीरात काय बदल घडतात?
इंडियन एक्स्प्रेसने माहिती देताना एका क्लिनिकल तज्ज्ञाशी संवाद साधला आणि तुपाच्या सेवनामुळे होणारे धोके व फायदे समजावून घेतले.
तुम्ही अचानक तूप खाणे बंद केले तर काय होते?
“जर तुम्ही अचानक तूप खाणे बंद केले तर तुमचे शरीर स्वतःला विषमुक्त करण्यास सुरुवात करेल. काहींना हे बदल त्यांच्या पचनसंस्थेसाठी थोडे त्रासदायक वाटू शकते, तर काहींना हा बदल आवडू शकतो,” असे मरेंगो एशिया हॉस्पिटल्सच्या प्रमुख आहारतज्ज्ञ डॉ. नीती शर्मा म्हणाल्या.
“वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे आणि आहारात तूप घेत असलेल्यांसाठी, तूप कायमचे टाळणे मदत करू शकते, परंतु ते पोषक तत्वांचे शोषणदेखील थांबवेल आणि तुमच्या आहारासाठी आवश्यक असलेले मौल्यवान पोषक तत्वे प्रदान करणार नाहीत,” असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
त्यांच्या मते, जर तुम्ही तुपाचे सेवन काही काळ थांबवले तर तुमच्या आहारात ट्रान्स फॅट्सची कमतरता कोलेस्ट्रॉलची पातळी स्थिर करण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
“दिवसातून एक चमचा तूप पुरेसे असावे. तुपाचे प्रमाण कमी असल्याने ते कमी प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे; कारण जास्त प्रमाणात तुपाचे सेवन केल्याने हृदयरोग होऊ शकतात, तसेच तुमच्या धमन्या बंद होऊ शकतात,” असे शर्मा सांगतात.
तुपाचे आरोग्यदायी फायदे (Health benefits of ghee)
शर्मा यांनी सांगितले की, “तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे पचनक्रिया सुधारतात, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि व्हिटॅमिन्सने समृद्ध असतात. त्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत तसेच त्याचं कॅन्सरपासून संरक्षण करण्याची क्षमता आहे. तुपाचा वापर भाजल्यामुळे होणार्या जखमा बऱ्या करण्यासाठी केला जातो, तसेच त्वचेची लवचिकता वाढवण्यास मदत होते.”
त्या पुढे म्हणाल्या, “तुपामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिडसह फॅट्सचे प्रमाण जास्त असते, जे हृदयरोग टाळण्यास मदत करतात. जर तुम्ही दररोज एक चमचा तूप घेतलं तर सीरम कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका घटतो.”
रक्तातील साखर नियंत्रणात
डॉ. अर्चना बत्रा, (डायटिशियन आणि सर्टिफाइड डायबिटीज एज्युकेटर) यांच्या मते, “तुपाची खास रचना मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते आणि दिवसभर ऊर्जा संतुलित पद्धतीने मिळते. तुपामध्ये ब्यूटिरिक ॲसिड असतं, जे अँटी-इन्फ्लेमेटरी असून पचनसंस्था व एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहे.”
सकाळी तुपाचे सेवन केल्याने इतर अन्नातील फॅट-सोल्युबल पोषक घटक शोषले जातात आणि शरीराला अधिक फायदा होतो. “तसेच तुपाचे अँटी-इन्फ्लेमेटरी गुण सांध्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात,” असं त्या म्हणाल्या.
मात्र, त्यांनी याकडे लक्ष वेधलं की, तुपामध्ये oxidized cholesterol असतं, जे ताज्या लोण्यामध्ये नसतं, त्यामुळे जास्त प्रमाणात तूप सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
किती तूप जास्त आहे?
बहुतेक आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दररोज १–२ टेबलस्पून तुपाचं सेवन योग्य आहे. पण, हे प्रमाण तुमच्या आहार, शारीरिक हालचाल आणि आरोग्यस्थितीनुसार बदलू शकतं.
“हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की, प्रमाणात सेवन करणं हाच मुख्य नियम आहे – अगदी किटो डायेटमध्येही. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलबाबत किंवा इतर आरोग्याच्या समस्यांबाबत शंका असेल तर नोंदणीकृत डायटिशियन किंवा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणं सर्वात योग्य ठरेल,” असेही त्यांनी सांगितले