Best oil for cooking: सणासुदीच्या काळात तेलकट पदार्थ थोड्या जास्त प्रमाणातच खाल्ले जातात. याचा एकूणच आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. करंजी, चकली, शंकरपाळी, चिवडा असा दिवाळीचा फराळ तसंच घरोघरी बनणारं चमचमीत जेवण यामध्ये पुऱ्या, कचोऱ्या हे सर्व जास्त प्रमाणात खाल्लं जातं. अनेक जण स्वयंपाकासाठी मोहरीचं किंवा रिफाइंड तेल वापरतात. असं असताना हे आरोग्यासाठी हानिकारक मानलं जातं असं तज्ज्ञांचं मत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, काही तेलांचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. या तेलांमध्ये शिजवलेले, तळलेले अन्न खाल्ल्याने तुमचे ह्रदय आणि मन दोन्ही निरोगी राहील. तसंच वजन वाढण्यासही प्रतिबंध होईल. स्वयंपाकासाठी नेमके कोणत्या प्रकारचे तेल वापरावे याबाबत तज्ज्ञांनी काही माहिती दिली आहे.

प्रसिद्ध अमेरिन गॅस्ट्रोएन्टोरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितले की, जर तुम्ही योग्य स्वयंपाक तेल निवडले तर तेलकट अन्न तुमचे कधीही नुकसान करणार नाही. उलट त्याने तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला तंदुरूस्त ठेवेल.

नारळ तेल

आपण वर्षानुवर्षे नारळाचे तेल वापरत आहोत. मात्र, तुम्ही कधी ते स्वयंपाकासाठी वापरले आहे का? या तेलात शिजवलेले अन्न लवकर खराब होत नाही किंवा जळतही नाही. ते कमी तेलकटदेखील मानले जाते. नारळाचे तेल शरीराला ऊर्जा प्रदान करते.

शेंगदाणा तेल

तुम्ही स्वयंपाकासाठी शेंगदाण्याचे तेलदेखील वापरू शकता. शेंगदाण्याच्या तेलात आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. शिवाय त्यात शिजवलेले अन्न खराब होत नाही.

तूप

भारतीय स्वयंपाकघरांमध्ये अनेक वर्षांपासून तूप वापरले जाते. असं असताना तूप महाग असलं तरी ते घरच्या घरीही तयार करता येतं. महाग असल्याने अनेक जण तेल किंवा रिफाइंड तेलचा वापर करतात. तुम्ही तूप वापरून देखील स्वयंपाक करू शकता. त्याचा धूराचा बिंदू ४५० डिग्री आहे, त्यामुळे ते तळण्यासाठी योग्य मानले जाते.

एवोकॅडो तेल

ऍवोकॅडो तेल हे तळण्यासाठी उत्तम मानले जाते. ऍवोकॅडो तेलाला चांगला सुगंध असतो आणि त्यात शिजवलेले पदार्थ मऊ राहतात. त्याचा धूर बिंदू खूप जास्त असतो. तो ५२० डिग्री असल्याने तुम्ही अगदी उच्च तापमानावर पदार्थ तळू शकता.