मधुमेह हा एक असा आजार आहे ज्याच्या रुग्णांची संख्या देशात आणि जगात झपाट्याने वाढत आहे. कोविड-१९ महामारीनंतर मधुमेही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हा एक सामान्य आजार बनत चालला असून प्रत्येक वयोगटातील लोक या आजाराला बळी पडत आहेत. हा आजार मुळापासून नष्ट करण्याचा कोणताही इलाज नाही, फक्त त्यावर नियंत्रण मिळवता येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Lacent Diabetes & Endocrinology मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, टाईप २ मधुमेह असलेल्या रुग्णांची संख्या येत्या २० वर्षांत चिंताजनक पातळीवर पोहोचेल. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार, २०४५ सालापर्यंत भारतात टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांची संख्या १३४ दशलक्षांपेक्षा जास्त असेल.

( हे ही वाचा: Blood Sugar: ब्लड शुगर वाढल्यास पायात दिसतात ही ३ गंभीर लक्षणे; जाणून घ्या पायाच्या कोणत्या भागात होतो त्रास)

मधुमेह हा एक आजार असून त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच शरीराची क्रिया सुरू ठेवणे आवश्यक आहे. वाढत्या मधुमेहामध्ये तणाव हा सर्वात मोठा शत्रू आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर सामान्य असणे महत्वाचे आहे. रक्तातील साखरेची पातळी २०० mg/dl पेक्षा जास्त झाल्यास शरीरातील अनेक अवयवांना इजा होऊ शकते. मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी २००-४०० mg/dl असल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांची साखरेची पातळी २००-४००mg/dl असताना त्यांच्यावर नियंत्रण कसे ठेवायचे ते जाणून घेऊया.

मधुमेहाच्या रूग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ७०-१०० mg/dl दरम्यान असावे. जेवणानंतर दोन तासांनी १३०-१४० mg/dl सामान्य आहे. खाल्ल्यानंतर जर तुमची साखरेची पातळी २००-४०० mg/dl पर्यंत पोहोचली तर काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, ज्यांना मधुमेह आहे त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.

( हे ही वाचा: Uric Acid: वाढत्या थंडीमुळे वाढू शकतो संधिवाताचा त्रास; ‘या’ उपायांनी झपाट्याने कमी करा यूरिक ऍसिडची समस्या)

अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की ५० ते ६० टक्के मधुमेही रुग्णांना हृदयविकार होऊ शकतो. साखरेवर नियंत्रण न ठेवल्यास त्याचा परिणाम हृदयावर नियंत्रण ठेवणाऱ्या रक्तवाहिन्याना हानी पोहोचवू शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, मधुमेह असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो

साखरेची पातळी २००-४०० mg/dl असताना कशी नियंत्रित करावी

  • जर रक्तातील साखरेची पातळी २०० पेक्षा जास्त असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा. साखर नियंत्रणाची औषधे घ्यावीत.
  • साखर नियंत्रित करण्यासाठी जीवनशैलीत बदल करा.
  • वजन कमी करा आणि आहारावर नियंत्रण ठेवा.
  • साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी गोड पदार्थ टाळा. गोड पदार्थ साखरेची पातळी लवकर वाढवतात.
  • मिठाचे सेवन कमी करा.
  • जेवणात मैदा, बटाटे यांसारखे पदार्थ टाळा.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If sugar level reached 200 400 mgdl may increase the risk of heart attack know the tips to control gps