मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त होते. सध्या मधुमेह हा आजार सामान्य बनत चालला आहे. प्रत्येक घरातील एकतरी रुग्ण मधुमेहाने ग्रस्त असतो. आपण जे अन्न खातो त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. शरीराच्या पेशींना ऊर्जेसाठी ग्लुकोजची गरज असते जी अन्नातून मिळते. इंसुलिन हा हार्मोन ग्लुकोजला तुमच्या पेशींमध्ये जाण्यास मदत करतो. टाइप १ मधुमेहामध्ये स्वादुपिंड इन्सुलिन तयार करत नाही तर टाइप 2 मधुमेहामध्ये स्वादुपिंड इन्सुलिन योग्यरित्या तयार करत नाही किंवा कमी तयार करतो.

पुरेशा इंसुलिनशिवाय, ग्लुकोज नेहमीप्रमाणे तुमच्या पेशींमध्ये जाऊ शकत नाही. तुमच्या रक्तात ग्लुकोज तयार होते आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. मधुमेही रुग्णांनी साखरेवर नियंत्रण ठेवले नाही तर किडनी, फुफ्फुस, हृदय अशा शरीरातील अनेक अवयवांना आजार होण्याचा धोका वाढू शकतो. मधुमेही रुग्णांमध्ये साखर वाढल्याने रुग्णाच्या डोळ्यांना आणि पायालाही इजा होऊ शकते. मधुमेही रुग्णांची साखर वाढल्याने पायात अनेक प्रकारचे त्रास सुरू होतात. साखर वाढली की पायात तीन लक्षणे दिसतात. जाणून घेऊया पायाच्या कोणत्या भागात जास्त वेदना होतात.

priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
sugar intake
शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहावे यासाठी फॉलो करा ‘या’ ४ टिप्स, जाणून घ्या सविस्तर
When blood sugar level becomes high or low know the reason and its symptoms
ब्लड शुगर कमी किंवा जास्त कधी होते? याची लक्षणं कोणती? जाणून घ्या
what is normal blood sugar level
तुमच्या वयानुसार तुमची Blood Sugar किती हवी? जाणून घ्या ‘हा’ सोपा तक्ता

( हे ही वाचा: Uric Acid: युरिक ऍसिड फक्त एका महिन्यात कमी होईल; ‘या’ ३ प्रकारच्या पानांचे सेवन करा, मिळेल आश्चर्यकारक फायदा)

मधुमेहामुळे पायाच्या समस्या कशा होतात?

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने पायातील नसा आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. पायातील नसांना झालेल्या नुकसानास डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात, ज्यामध्ये पाय सुन्न होणे, मुंग्या येणे, वेदना होणे किंवा अनुभवण्याची क्षमता कमी होणे सुरू होते. जेव्हा रुग्णाला पायाचे दुखणे अनुभवता येत नाही, तेव्हा त्या रुग्णाला पायाला झालेली इजा, कट कळत नाही. पायात इन्फेक्शन होते जे लवकर बरे होत नाही. पायांमध्ये संवेदना कमी झाल्यामुळे, पाय दुखणे किंवा कापल्या गेल्यामुळे पाय खराब होतात.

रक्तातील साखर वाढली की पायात ही ३ लक्षणे दिसतात.

  • रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की पायाला सूज येऊ लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पायांना सतत सूज येणे हे साखर वाढण्याचे लक्षण आहे.
  • पायाला जखम भरण्यासाठी बराच वेळ लागणे हे देखील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे लक्षण आहे.
  • पाय सुन्न होणे हे देखील उच्च रक्तातील साखरेचे लक्षण आहे.

( हे ही वाचा: करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘Brain Fog’चा धोका; जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावासाठी उपाय)

पायाच्या कोणत्या भागावर साखर वाढवण्याचा सर्वात जास्त परिणाम होतो

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने पाय आणि पायाची बोटे दुखणे किंवा सुन्न होण्याच्या समस्या वाढतात.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे

  • दररोज आपले पाय तपासा. पायावर काही जखमा असतील तर लगेच डॉक्टरांना भेटा.
  • दररोज आपले पाय स्वच्छ करा. पाय धुवून कोरडे करा.
  • पायाची नखे वेळोवेळी कापा.
  • चालताना तुमच्या पायांचे रक्षण करण्यासाठी नेहमी शूज आणि मोजे किंवा चप्पल घाला.
  • आपल्या पायांचे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करा.