हृदयरोगापासून कॅन्सरपर्यंत काही बाबतीत गुणकारी ठरणारा कांदा खाल्ल्याने होऊ शकतात हे अपाय; लगेच जाणून घ्या

कांदा खाल्ल्याने शरीराला काय फायदे आणि तोटे होतात जाणून घ्या.

onion benefits and side effects on health
Photo : Freepik

Onion Benefits And Side Effects : बऱ्याच जणांना जेवणाबरोबर कांदा खायला आवडतो. कांद्यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात, त्यामुळे त्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेक शारीरिक आजरांवर कांदा खाणे फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात तज्ञांकडून कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरातील उष्णता जास्त वाढत नाही. कांद्याचे सेवन करण्याबरोबरच अनेक स्त्रिया केसगळतीसाठी कांद्याच्या रसाचा वापर करतात. अशाप्रकारे अनेक फायदे असणाऱ्या कांद्याचे शरीराला काही तोटे देखील होऊ शकतात.

कांद्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, जीवनसत्त्व ए, सी आणि ई यांसह कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळतात. कांद्यामध्ये अँटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म देखील आढळतात. त्यामुळे कांदा एक प्रकारचे सुपरफूड मानले जाते. कांदा खाल्ल्याने काय फायदे आणि तोटे होऊ शकतात जाणून घ्या.

आणखी वाचा : जास्त दिवस केळी टिकवून ठेवण्यासाठी वापरा ‘या’ पद्धती; नक्की दिसेल फरक

कांदा खाल्ल्याने शरीराला मिळतील हे फायदे

हृदयासाठी फायदेशीर
एका अहवालानुसार, कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड्सचे गुणधर्म असतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. याशिवाय कांदा थियो सल्फाइट्सच्या सेवनाने रक्ताची स्थिरता टिकून राहण्यास मदत मिळते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.

कॅन्सरवरील उपचारासाठी फायदेशीर
कच्चा कांदा कर्करोगाशी लढण्यासाठी गुणकारी मानला जातो. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण खूप जास्त असते, जे कर्करोगाच्या पेशी वाढू देत नाही. तसेच यामुळे कर्करोगाशी लढण्याची क्षमता वाढते.

हाडांसाठी फायदेशीर
कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते त्यामुळे कांद्याचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.

आणखी वाचा : या सवयींमुळे वाढतो मधूमेह होण्याचा धोका; लगेच करा बदल

कांदा खाल्ल्याने होऊ शकतात हे तोटे

लो शुगरची समस्या असणाऱ्यांना ठरू शकते त्रासदायक
ज्या लोकांना लो शुगरची समस्या असते त्यांनी कांद्याचे सेवन कमी करावे. कारण कांद्यामुळे साखरेची पातळी आणखी कमी होण्याची शक्यता असते.

गरोदर महिलांनी जास्त कांदा खाणे टाळावे
गरोदर महिलांनीही मर्यादित प्रमाणात कांद्याचे सेवन करावे, कारण जास्त प्रमाणात कांदे खाल्ल्याने प्रसूतीदरम्यान वेदनांचा त्रास अधिक होऊ शकतो.

बद्धकोष्ठता आणि ओटीपोटात दुखणे
कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटदुखी आणि बद्धकोष्टतेची (Constipation) समस्या उद्भवू शकते.

Health Tips : झोपण्याआधीच्या ‘या’ सवयी करतील निरोगी राहण्यास मदत

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-09-2022 at 09:28 IST
Next Story
रिफाइंड तेलाचा अतिवापर शरीरासाठी ठरू शकतो हानिकारक! जाणून घ्या वापरण्याचे योग्य प्रमाण
Exit mobile version