कॉलेजला, ऑफिसला जाताना किंवा अगदी दररोज बुट घालून बाहेर पडण्याची सवय बऱ्याच जणांना असते. परंतु दिवसभर बुट घातल्याने पायांना घाम घेतो, आणि त्याचा दुर्गंध बुटांना यायला सुरूवात होते. अनेक जण बुटांमधील या दुर्गंधीमुळे त्रस्त असतात. या दुर्गंधीपासून सुटका कशी मिळावायची हे बऱ्याच जणांना माहित नसते. त्यामुळे एक तर सतत बुट धुतले जातात किंवा अति दुर्गंध येत असेल तर बुट फेकुन दिले जातात. त्यातही सतत बुट धुतल्याने खराब होण्याची शक्यता असते. यावरील उपाय म्हणजे काही घरगुती टिप्स वापरून तुम्ही सहजरित्या बुटांच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता. कोणते आहेत हे घरगुती उपाय जाणून घेऊया.

आणखी वाचा : जास्त दिवस केळी टिकवून ठेवण्यासाठी वापरा ‘या’ पद्धती; नक्की दिसेल फरक

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग

बुटांमधील दुर्गंधी घालवण्यासाठीचे घरगुती उपाय

  • प्रत्येक किचनमध्ये उपलब्ध असणारा बेकिंग सोडा हा बुटांच्या दुर्गंधीपासून मुक्तता मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी दररोज रात्री बेकिंग सोडा बुटांमध्ये शिंपडा. यामुळे बुटांमध्ये राहणारा घाम शोषला जाईल आणि वास पसरवणारे बॅक्टेरिया मारण्यास देखील मदत करते.
  • ज्या लोकांच्या बुटांना खूप दुर्गंध येतो, ते बुटामध्ये कोरड्या चहाच्या पिशव्या ठेवू शकतात.
  • पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करूनही बुटांमधील दुर्गंध घालवता येतो. यासाठी फक्त पाण्यात पांढरे व्हिनेगर मिसळून बुट धुवा. याशिवाय काही वेळ व्हिनेगरच्या पाण्यात पाय बुडवून ठेवल्याने पायांना येणारा घामाचा वास तुम्ही टाळू शकता.
  • बुटांना येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी लॅव्हेंडर तेल देखील वापरले जाते. यासाठी या तेलाचे काही थेंब बुटामध्ये शिंपडा. त्याचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म दुर्गंध दूर करण्याचे काम करतात.