भारतामध्ये असे एकच ठिकाण आहे ज्याला देवभूमी या नावाने ओळखले जाते. उत्तराखंड राज्यात उंच बर्फाच्छादित पर्वत, हिरवळ यामुळे या ठिकाणी देवाधिदेव महादेव वास्तव्यास असल्याचे मानले जाते. असं म्हणतात की इथली भूमी इतकी पवित्र आहे की, पांडवांसोबतच अनेक मोठमोठ्या राजांनी तपश्चर्येसाठी हेच ठिकाण निवडले होते. तसेच, उत्तराखंडमध्ये असा एक धबधबा आहे, ज्याच्या पाण्याला कोणताही पापी मनुष्य हात लावू शकत नाही, असेही म्हटले जाते. आज आपण याच धबधब्याविषयी याविषयी जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी असा उल्लेख आढळतो की देवभूमी उत्तराखंडमध्ये महादेवाचे अस्तित्व आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रे येथे आहेत. पांडवांनीही याच ठिकाणाहून स्वर्गासाठी प्रस्थान केले असे म्हणतात. तसेच, उत्तराखंड हे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचे उगमस्थान आहे.

चुकीच्या सवयींमुळे लागत नाही चांगली झोप; ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून दूर करा समस्या

उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ धामपासून ८ किमी अंतरावर वसुंधरा धबधबा आहे. या धबधब्यातून पडणारे पाणी मोत्यांसारखे भासते. असे म्हणतात की, उंचावरून पडल्यामुळे त्याचे पाणी दूरवर पोहोचते. पण त्याखाली एखादा पापी मनुष्य उभा राहिला तर झर्‍याचे पाणी त्याच्या शरीराला स्पर्शही करत नाही, अशी एक पौराणिक कथा आहे. बद्रीनाथ धामला जाणारे भाविक या धबधब्याला नक्कीच भेट देतात. हा अतिशय पवित्र धबधबा असल्याचे सांगितले जाते.

असे मानले जाते की या झऱ्याच्या पाण्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. वास्तविक या झर्‍याचे पाणी अनेक वनौषधी वनस्पतींना स्पर्श करताना पडते. ज्या व्यक्तीच्या अंगावर या झर्‍याचे पाणी पडते, त्याचे आजार बरे होतात, असाही समज आहे.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People cannot touch the water of this waterfall the reason is very interesting pvp