Benefits Of Sleeping On Your Left Side: प्रत्येक व्यक्तीला २४ तासांमध्ये किमान सात-आठ तास विश्रांती घेणे आवश्यक असते. रात्री शांतपणे झोप घेतल्याने शरीराला नवीन ऊर्जा मिळते. निरोगी राहण्यासाठी निद्राचक्र पूर्ण होणे आवश्यक असते. झोपण्याच्या वेगवेगळ्या शैलींवरून तुमच्या शरीरावर अनेक प्रकारचे प्रभाव आढळून येतात. प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. काहींना पोटावर उपडे झोपल्यावर चांगली झोप लागते तर काहींना एक पाय धावण्याच्या पोजिशनमध्ये व एक पाय सरळ अशा पद्धतीने झोप लागते. पण तुम्हाला माहित आहे का झोपण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. इतकंच नव्हे तर तुम्ही कोणत्या कुशीवर झोपता हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तज्ज्ञांच्या माहितीनुसार डाव्या कुशीवर झोपल्याने अनेक फायदे मिळू शकतात, या फायद्यांची काही उदाहरणे खालीलप्रमाणे:

१) डाव्या कुशीवर झोपल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. यामुळे ऍसिड रिफ्लेक्स व हृदयाजवळ छातीत जळजळ होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. स्वादुपिंडाच्या आरोग्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे मदत करू शकते.

२) ज्यांना सर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास होतो त्यांना कालांतराने तोंडाने श्वास घेण्याची सवय लागते. सतत घोरण्यामागे हे सुद्धा एक कारण ठरू शकते. डाव्या बाजूच्या कुशीवर झोपल्याने नाकपुड्या मोकळ्या होण्यास मदत होऊ शकते परिणामी नाकाने श्वास घेणे सहज होऊन घोरण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते.

३) वर म्हंटल्याप्रमाणे, डाव्या बाजूच्या कुशीवर झोपल्याने छातीत जळजळ कमी होऊ शकते. आपले हृदयही किंचित डाव्या बाजूला असल्याने अशाप्रकारे झोपल्यास रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होऊ शकते परिणामी हृदयाच्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

४) डाव्या कुशीवर झोपल्याने शरीरातील सर्व अवयवांसह रक्तप्रवाह व त्यासह ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. यामुळे वेळेआधीच अवयव थकण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते. मेंदूसाठी सुद्धा ही स्थिती फायदेशीर ठरू शकते.

हे ही वाचा<< ‘या’ महिलांच्या मुलांना असतो लठ्ठपणाचा तिप्पट धोका! संशोधनात समोर आली थक्क करणारी माहिती

५) सहसा गरोदर महिलांना सुद्धा डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो. या पद्धतीने झोपल्यास गर्भात बाळ आरामदायी स्थितीत राहू शकते व त्यावर दबाव पडत नाही. तसेच गरोदरपणात पायाला येणारी सूज सुद्धा कमी होऊ शकते.

(वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास दावा समजू नये, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला नक्की घ्या)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Perfect position to sleep left or right side how it can help get rid of snoring pregnancy posture health expert explains svs