सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे हे २०१४ च्या निवडणुकांनी दाखवून दिले आहे. फेसबुक, ट्विटर या माध्यमांवर अनेक राजकारणी, नेते सक्रिय आहेत. त्याचा फायदा प्रसारमाध्यमांनाही होतो आहे. एक काळ असा होता की माध्यमांमधील बातमी पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असे आता मात्र सोशल मीडियाच्या पोस्टवरून बातमी केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वाधिक फॉलोअर्स ट्विटरवर आहेत. तसेच राहुल गांधी, राज ठाकरे यांचेही फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावर आहेत.
सोशल मीडियावरचे टॉप ५ राजकारणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी</strong>
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकत भाजपाला सर्वात मोठे यश मिळवून दिले. त्यांच्या या यशाचे बरेचसे श्रेय सोशल मीडियालाही जाते. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदीही अॅक्टिव्ह आहेत. त्यांचे ट्विटरवर ४ कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत
राहुल गांधी
राहुल गांधी यांचेही ट्विटरवर बहुतांश फॉलोअर्स आहेत. ७ कोटींच्यावर फॉलोअर्स त्यांना ट्विटरवर फॉलो करतात. ट्विटरवर राहुल गांधीही सक्रिय असतात. त्यांच्या ट्विटचीही बातमी होते.
शरद पवार
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे देखील ट्विटरवर सक्रिय आहेत. त्यांचे ट्विटरवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अनेक घटनांबाबत ते ट्विटरवर ट्विट करत असतात.
सुषमा स्वराज
केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज याही ट्विटरवर प्रचंड सक्रिय आहेत. त्यांना ट्विट केल्यावर त्यांनी अनेक नेटकऱ्यांच्या समस्याही सोडवल्या आहेत. १ कोटीपेक्षा जास्त नेटकरी त्यांना फॉलो करतात.
राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मे महिन्यातच ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे. त्यांचे ट्विटर हँडल ३२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी फॉलो केले आहे.