Amruta Khanvilkar Video : अमृता खानविलकर नेहमी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. नवनवीन चित्रपट, वेबसिरीजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर येत असते. अमृताने फक्त उत्तम अभिनयानेच नाही नृत्यकलेने लाखो लोकांचे मन जिंकले आहे. सोशल मीडियावर सुद्धा ती खूप सक्रिय असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तिने प्रोटिन शेक बनवले आहे. ते कसे बनवले, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
अमृता तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगते,”जपानवरून आल्यावर मी माझं डाएट सुरू केलं आहे. ६० तासाच्या उपवासानंतर हा माझा पहिला पदार्थ आहे, हे मी कसं बनवते, हे मी तुम्हाला सांगते. एकतर माझ्याकडे पोर्टेबल ब्लेंडर आहे, तुम्हाला अॅमेझॉनवर मिळेल. त्यानंतर काल रात्री भिजवून ठेवलेले चिया सीड्स, घरी बनवलेलं ओट मिल्क, त्यानंतर नो नॉनसेन्स प्लान्ट प्रोटिन, खजूर आणि वाळवलेल्या टरबूज आणि भोपळ्याच्या बिया आणि ग्रीक दही आहेत.”
व्हिडीओत तुम्हाला दिलेल की अमृता सुरवातीला पोर्टेबल ब्लेंडरमध्ये ग्रीक दही टाकते. त्यात थोडं ओट मिल्क टाकते. त्यानंतर त्यात ती खजूर टाकते. ती दोन तीन चार खजूर टाकते. त्यानंतर ती थोडं पाणी टाकते. त्यानंतर ती २० ग्रॅम प्रोटिन टाकते. सर्व मिश्रण ती ब्लेंडर मध्ये फिरवते. त्यानंतर रात्री भिजवलेल्या चिया सीड्समध्ये ती हे सर्व मिश्रण टाकते.त्यानंतर ती वरून वाळवलेल्या टरबूज आणि भोपळ्याच्या बिया टाकते. ती पुन्हा मिश्रण एकत्र करते.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
अमृता सांगते की हे प्रोटिन शेक प्यायल्यानंतर तिला साधारण तीन ते चार तास भूक लागत नाही. मी प्रवास करते किंवा शूट करते, तेव्हा हे खूप चांगले आहे.
amrutakhanvilkar या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अमृताने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजचा विषय जरा वेगळा आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप स्वादिष्ट आहे, मला खूप आवडलं” तर एका युजरने लिहिलेय, “छान आहे, मी करून बघेन” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.