Want to avoid a heart attack? So start checking blood cholesterol level from 'this' age | Loksatta

हृदयविकाराचा झटका टाळायचा आहे? तर ‘या’ वयापासूनच तपासायला सुरु करा रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी

कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असले तरी त्याचे वाढलेले प्रमाण धोकादायक मानले जाते.

blood cholesterol level
नियमितपणे कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्याची सवय असणे खूप महत्वाचे आहे. (प्रातिनिधिक फोटो)

कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा पदार्थ आहे जो आपल्या रक्तात आढळतो आणि शरीरातील विशिष्ट कार्यांसाठी तो आवश्यक असतो. कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असले तरी त्याचे वाढलेले प्रमाण धोकादायक मानले जाते. याचे एक कारण म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त पेशी आकुंचन पावू लागतात, त्यामुळे धमन्यांमधील रक्तप्रवाह कमी होतो. जेव्हा हे कोलेस्ट्रॉल तुटते तेव्हा त्याला गुठळ्या तयार होऊ लागतात आणि यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताची समस्या उद्भवते.

तसेच, इतर रोगांप्रमाणे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र जेव्हा ही लक्षणे दिसू लागतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच नियमित आरोग्य तपासणी करणे हे रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची प्रकरणे लक्षात घेता, नियमितपणे कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्याची सवय असणे खूप महत्वाचे आहे. भारतातील या प्रकरणांच्या वाढत्या संख्येविषयी बोलायचे झाले तर येथे शहरातील २५ ते ३० टक्के लोक आणि ग्रामीण भागातील १५ ते २० टक्के लोक कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहेत. एका अभ्यासानुसार, २० वर्षांच्या कालावधीत शहरी लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

वयानुसार कोलेरॉलची आदर्श पातळी किती आहे?

१९ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी १७० एमजी/डीएलच्या खाली असावी. प्रौढांमध्ये कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी २०० पेक्षा कमी असावी. ज्या लोकांचे कोलेस्ट्रॉल २०० ते २३९ च्या दरम्यान आहे त्याला बॉर्डर लाइन कोलेस्ट्रॉल म्हणतात. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी यापेक्षा कमी ठेवणे महत्त्वाचे आहे. २४० वरील कोलेस्ट्रॉल धोकादायक मानले जाते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, २० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी दर पाच वर्षांनी त्यांच्या कोलेस्ट्रॉलची तपासणी केली पाहिजे. त्यानंतर चाचणी करण्याचे प्रमाण वाढविले जाऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-09-2022 at 08:58 IST
Next Story
Dengue Fever: किती दिवस असतो डेंग्यूचा ताप; तो पूर्णपणे बरा करण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय