Low Uric Acid: यूरिक ऍसिडची निर्मिती ही एक सामान्य प्रक्रिया आहे. ज्याला शरीरातील निरुपयोगी गोष्ट समजली जाते. प्युरिन हा एक रासायनिक पदार्थ आहे जो नैसर्गिकरित्या शरीरात आणि विशिष्ट पदार्थांमध्ये असतो. जेव्हा शरीर प्युरिनचे विघटन करते तेव्हा ते युरिक ऍसिडला एका निरुपयोगी वस्तू समान बनवते. किडनी ते रक्तातून फिल्टर करतात आणि मूत्राद्वारे शरीरातून काढून टाकतात. यूरिक ऍसिड तयार होणे आणि शरीरातून बाहेर पडणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यूरिक अॅसिड जास्त होण्याच्या समस्येने बहुतेक लोक त्रस्त असतात. मेटाबॉलिक लक्षणे, अल्कोहोल पिणे, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि प्युरीन आहार यांसारखी अनेक कारणे यूरिक अॅसिड वाढण्यास जबाबदार आहेत ज्यामुळे यूरिक अॅसिडची पातळी वाढू लागते. सांधेदुखी, स्नायू दुखणे, बसताना सांधेदुखी, पायाची बोटे दुखणे आणि घोट्यात दुखण्याची तक्रार ही युरिक ऍसिडची लक्षणे असू शकतात.

( हे ही वाचा: तुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही)

तुम्हाला माहित आहे की शरीरात यूरिक ऍसिडचे प्रमाण जितके त्रासदायक आहे तितकेच ते कमी होणे देखील एक समस्या बनते. ज्या लोकांच्या शरीरात युरिक अॅसिड तयार होत नाही त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. युरिक अॅसिड हे शरीरात तयार होणारे टॉक्सिन असते, जे किडनी फिल्टर करून शरीरातून काढून टाकते, परंतु ज्या लोकांच्या शरीरात हे टॉक्सिन लतयार होत नाही त्यांना अनेक आजारांचा धोका असू शकतो. शरीरात यूरिक अॅसिड तयार न होण्यामागे खराब आहार आणि बिघडलेली जीवनशैली कारणीभूत आहे. जाणून घेऊया यूरिक अॅसिड कमी झाल्याने कोणत्या आजारांचा धोका वाढू शकतो.

हृदयविकाराचा धोका यामुळे वाढू शकतो

ज्या लोकांच्या शरीरात यूरिक अॅसिड कमी असते त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. साधारणपणे ३.५ ते ७.२ मिलीग्राम प्रति डेसीलिटर यूरिक ऍसिड शरीरात असले पाहिजे, यापेक्षा कमी प्रमाणात युरिक ऍसिडचे प्रमाण असल्यास शरीर अनेक आजार होऊ शकतात.

कर्करोग हा एक आजार असू शकतो

युरिक अॅसिडचे प्रमाण कमी असल्यामुळे शरीरात अँटी-ऑक्सिडंट्सचा प्रभाव कमी दिसून येतो, ज्यामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचा धोका जास्त असतो. यूरिक ऍसिडची पातळी कमी असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला लघवी कमी होते. लघवी कमी झाल्यामुळे रक्तातील टॉक्सिन प्रमाण वाढू लागते.

( हे ही वाचा: Uric Acid: ‘या’ ४ आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही युरिक अॅसिड आणि सांधेदुखीपासून मुक्त होऊ शकता; जाणून घ्या तज्ज्ञांकडून)

मूत्रपिंडाच्या आजारांमुळे धोका वाढू शकतो

  • कमी यूरिक ऍसिड फॅन्कोनी सिंड्रोम, एक दुर्मिळ किडनी रोगाचा धोका वाढवते. या आजारामुळे किडनी काही पोषक द्रव्ये शोषून घेऊ शकत नाही.
  • डिहाइड्रेशनची समस्या असू शकते
  • यूरिक ऍसिडचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते.
  • विल्सन रोगाचा धोका वाढू शकतो
  • शरीरात यूरिक ऍसिडचे कमी उत्पादन विल्सन रोगाचा धोका वाढवू शकतो. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीराच्या महत्वाच्या अवयवांमध्ये कॉपर जमा होते.
  • जर यूरिक ऍसिड कमी होत असेल तर आहारात या पदार्थांचा समावेश करा.
  • जर तुम्ही कमी युरिक अॅसिडमुळे त्रस्त असाल तर दररोज दोन ते तीन अक्रोडाचे सेवन करा.
  • आहारात ओटमील, बीन्स, ब्राऊन राईस असे फायबरयुक्त पदार्थ खा.
  • अजवाइनचे सेवन यूरिक ऍसिडची पातळी सामान्य करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the effects of low uric acid levels know its risk factors gps
First published on: 08-10-2022 at 00:24 IST