Heart Blockage : हार्ट ब्लॉकेज म्हणजे काय? जाणून घ्या याची लक्षणे आणि धोका

आज आपण हार्ट ब्लॉकेजच्या लक्षणांबद्दल आणि जोखीम घटकांबद्दल जाणून घेणार आहोत.

Heart Blockage symptoms
कोणत्या लोकांना हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढू शकतो याची जाणीव असणे आवश्यक आहे. (Photo : AP)

असंतुलित आहारामुळे आणि धावपळीच्या जीवनामुळे अनेकदा लोकांना हृदयविकाराचा त्रास होतो. अशा स्थितीत छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी अनेक लक्षणे हृदयात अडथळे आल्यास दिसून येतात. याशिवाय इतरही काही गोष्टी आहेत ज्यांची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच, कोणत्या लोकांना हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढू शकतो याची जाणीव असणे आवश्यक आहे. आज आपण हार्ट ब्लॉकेजच्या लक्षणांबद्दल आणि जोखीम घटकांबद्दल जाणून घेणार आहोत.

हार्ट ब्लॉकेज म्हणजे काय?

हार्ट ब्लॉकेजला एट्रिओव्हेंट्रिक्युलर ब्लॉक (एव्ही) किंवा कंडक्शन डिसऑर्डर असेही म्हणतात. खरंतर ही हृदयाच्या विद्युत प्रणालीतील एक खराबी आहे. यामुळे व्यक्तीच्या शरीरातील रक्ताभिसरणावरही विपरीत परिणाम होतो.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

हार्ट ब्लॉकेजची लक्षणे

आधी सांगितल्याप्रमाणे, जेव्हा हृदयात अडथळे येतात तेव्हा श्वास घेण्यास त्रास होतो आणि छातीत दुखते. परंतु यावेळी इतरही काही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत

 • चक्कर येणे
 • बेशुद्ध होणे.
 • दम लागणे.
 • जलद श्वास घेणे.
 • अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे.
 • छातीत दुखणे
 • मळमळ आणि उलट्यांचा त्रास होणे.
 • हृदयाचे अनियमित ठोके
 • धावणे किंवा व्यायाम करण्यात अडचण

Rainy Season Health Care Tips : पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ चार गोष्टी नक्की लक्षात ठेवा

या समस्येचा धोका कोणाला आहे?

 • कार्डिओमायोपॅथी रुग्ण
 • कोरोनरी थ्रोम्बोसिस रुग्ण
 • मायोकार्डिटिस किंवा हृदयाच्या स्नायूची जळजळ होत असल्यास
 • हृदयाच्या झडपांची जळजळ होत असल्यास
 • शस्त्रक्रिया किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे हार्ट ब्लॉकेज होऊ शकते.
 • हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाच्या ऑपरेशननंतर तीव्र किंवा अचानक हृदय ब्लॉक देखील होऊ शकतो. हे लाइम रोगाची गुंतागुंत म्हणून देखील उद्भवू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is heart blockage know the symptoms and dangers pvp

Next Story
यापुढे चुकूनही फेकू नका आंब्याच्या साली; याच्या सेवनाने ‘हे’ गंभीर आजारही दूर पळतील
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी