‘हर हर मोदी’ घोषणेमुळे निर्माण झालेला वाद शांत होण्यापूर्वीच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी ‘या मोदी सर्वभूतेषु’ अशी नवी घोषणा असलेले फलक वाराणसीत लावले आहेत.
नवरात्र महोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा देण्यासाठी सदर फलक मोदींच्या समर्थकांनी शहरात ठिकठिकाणी लावले असून त्यावर मोदी हे विजयाची खूण करीत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी दुर्गा सप्तशतीमधील श्लोकाचा आधार घेण्यात आला आहे.
‘या मोदी सर्वभूतेषु, राष्ट्ररूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:’ असा श्लोक नव्याने तयार करण्यात आला असून दुर्गा सप्तशतीमधील श्लोकाचा विपर्यास करण्यात आलेला नाही. मोदींबाबत जनतेच्या भावना काय आहेत त्याचे प्रतिबिंब नव्या श्लोकात उमटले आहे, असे भाजपचे काशीतील निमंत्रक अशोक चौरसिया यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2014 रोजी प्रकाशित
‘हर हर मोदी’नंतर आता ‘या मोदी सर्वभूतेषु’!
‘हर हर मोदी’ घोषणेमुळे निर्माण झालेला वाद शांत होण्यापूर्वीच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी ‘या मोदी सर्वभूतेषु’ अशी नवी घोषणा असलेले फलक वाराणसीत लावले आहेत.

First published on: 29-03-2014 at 04:56 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra ModiलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After har har modi its ya modi sarvbhuteshu in varanasi