काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाल्यास भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सहा महिन्यांत कारागृहात रवानगी केली जाईल, असे प्रक्षोभक वक्तव्य केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केले.
मोदी हे हुकूमशहा असल्याचे नमूद करून वर्मा यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. देशाचे आणि लोकशाहीच्या मंदिराचे रक्षण करण्याची जबाबदारी हिंदू आणि मुस्लिमांची आहे, असेही वर्मा म्हणाले.
मोदी हे हुकूमशहा आहेत आणि हुकूमशहा कधीही पंतप्रधान होऊ शकत नाही, भाजपला जे योग्य वाटते ते त्यांनी करावे. परंतु तरीही मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले.
मोदी हे गुजरात दंगलीतील आरोपी असल्याने, राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास मोदींची सहा महिन्यांत कारागृहात रवानगी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-04-2014 at 04:11 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi will be in jail if rahul becomes pm beni prasad verma