Aaditya Thackeray on Devendra Fadnavis over Kunal Kamra News : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कवित केल्याने त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांचा उल्लेख गद्दार असा करण्यात आल्याने शिंदेंचे समर्थक संतापले आहेत. त्यांनी रविवारी खार येथील क्लबमध्ये जाऊन तोडफोड केली. दरम्यान, याप्रकरणी आता युवानेते आदित्य ठाकरे यांनी विधान भवनात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. कुणाल कामराने कोणाचंही नाव घेतलेलं नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल का व्हावा असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्य ठाकरे म्हणाले, “मला वाईट याचं वाटतं की एकनाथ शिदेंच्याच कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच. कारण, कुमाल कामराने नाव कोणाचंही घेतलं नव्हतं. मग त्यांना मिर्ची लागायचं कारणच नव्हतं. पण त्यांनी ठरवंलय की आपला बॉस गद्दार आणि चोर आहे.”

मोदींची कॉन्सर्ट इकॉनॉमी कशी येणार?

“ज्या महाराष्ट्रात नागपूर दंगल झाली, कॉमेडी शो- गाण्याचे शो चालतात तिथे तोडफोड झाली, त्या महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? दोन महिन्यांपूर्वी मोदींनी कॉन्सर्ट इकॉनॉमीची चर्चा केली होती. अशी तोडफोड केल्यावर कॉन्सर्ट इकॉनॉमी येणार आहे का? मागच्याच आठवड्यात तीन तासांच्या मुलाखतीत ते म्हणाले होते की लोकशाहीत टीका टिप्पणी गरजेची असते, हे त्या विचारांना धरून चालणारे एकनाथ शिंदे आहेत का? या घटना घडल्यानंतर आपल्या राज्यात कोणीही येणार नाही”, असंही आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.

“कुणाल कामराने कोणाची माफी मागावी? एकनाथ शिंदे चोर आणि गद्दार आहेत हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का? मी जेव्हा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा मला माहीत नव्हतं की तो कोणाबद्दल बोलतोय. हेच समर्थक कोरटकर, सोलापूरकर, कोश्यारींच्या घरी आंदोलन करतील का?” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray on devendra fadnavis over kunal kamra case sgk