सातारा: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि निलंबित उपनिरीक्षक गोपाळ बदाने याला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. त्यांने फलटण शहर पोलिसांसमोर रात्री आत्मसमर्पण केले. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही माहिती दिली. यापूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री आत्महत्या केली. त्या दिवसापासून वरील दोन्हीही संशयीत आरोपी फरारी होते. त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. या प्रकरणी संशयित प्रशांत बनकर याला पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली. तर या प्रकरणी मुख्य संशयित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने फरार होता. त्याच्या तपासासाठी पोलीस पथके कार्यरत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली होती. बनकरला न्यायालयाने पुढील चौकशीसाठी २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गोपाल बदाने याला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या महिला डॉक्टरच्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहिलेले होते. त्यामध्ये दोन जणांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
दरम्यान, या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणात मुख्य संस्थेत संशयित उपनिरीक्षक गोपाळ बदाने याला अटक केल्याने याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या दोन झाली आहे.
मुख्य संशयित आरोपी निलंबित उपनिरीक्षक गोपाळ बदने हा फलटण शहर पोलिसांना शरण आला असून त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी संशयित आरोपी प्रशांत बनकरला अटक केली होती,त्यामुळे आता या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे.
दरम्यान मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रविवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री फलटण दौऱ्यावर येत आहेत.त्यामुळे याविषयी ते आता काय प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि माध्यमांशी काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.
