“शेतकरी आत्महत्या ही सर्वात दुर्दैवी बाब”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली खंत

औरंगाबाद आणि जालनामध्ये कृषी विद्यापीठाचे युनिट उभारण्याचा विचार करत असल्याचे मत सत्तारांनी व्यक्त केलं आहे.

“शेतकरी आत्महत्या ही सर्वात दुर्दैवी बाब”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली खंत
कृषीमंत्री अब्दुल सत्तार

नवे राज्यासरकार स्थापन झाल्यानंतर जवळजवळ ४० दिवसानंतर मंत्रिमडळाचा विस्तार करण्यात आला. काल (१४ ऑगस्टला) मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. अब्दुल सत्तार यांच्याकडे राज्याच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. शेतकरी आत्महत्या ही सर्वात दुर्दैवी बाब असल्याचं मत कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत अर्जून खोतकरही उपस्थित होते.

हेही वाचा- शासकीय कार्यालयांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं का? अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

औरंगाबाद आणि जालनामध्ये कृषी विद्यापीठाचे युनिट उभारणार

परभणीमध्ये कृषी विद्यापीठाचे एक युनिट आहे. या व्यतरीक्त औरंगाबाद आणि जालनामध्ये असेच एक युनिट उभारण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यासाठी एक कमिटी नेमून याबाबत अहवाल घेण्यात येईल. मराठवाडा आणि विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्या करतोय ही बाबच सर्वात दुर्देवी असल्याचे सत्तारांनी म्हणले आहे.

शेतकऱ्यांसाठी नव्या योजना आखणार

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांसाठी नव्या योजना आखण्याचा विचार आम्ही करत आहोत. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या अगोदर ज्या योजनांचा लाभ मिळाला नाही ते सर्व लाभ मिळवून देण्याच प्रयत्न मी करणार आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाने मला यापूर्वीच्या कामाची माहिती दिली आहे. मिळालेल्या संधीचं सोन करणार असल्याचं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी केलं आहे.

हेही वाचा- शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला नसल्यावरून अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या….

सत्तरांचा विरोधकांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे १८-१८ तास काम करतात. मात्र मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे किती तास काम करतात हे मला माहित नसल्याचे अर्जुन खोतकर म्हणाले. तर दुसरीकडे मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिंदे गटाला झाडी, डोंगर दिल्याची टीका नाना पटोले यांनी केली होती. त्यावर विरोधकांनी जशे चष्मे लावले तसं त्यांना दिसतं. आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही पार पाडू, असे सत्तारांनी दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“एकनाथ शिंदे १८-१८ तास काम करतात आणि फडणवीस…”, अब्दुल सत्तार यांचं जालन्यात वक्तव्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी